google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार....मेहनतीचे पैसे बुडाले! ॲपच्या माध्यमातून दुप्पट पैशाच्या आमिषाने फसवणूक;

Breaking News

धक्कादायक प्रकार....मेहनतीचे पैसे बुडाले! ॲपच्या माध्यमातून दुप्पट पैशाच्या आमिषाने फसवणूक;

धक्कादायक प्रकार....मेहनतीचे पैसे बुडाले!


ॲपच्या माध्यमातून दुप्पट पैशाच्या आमिषाने फसवणूक;

 सोलापूर जिल्ह्यातील ३०० लोकांना कोट्यवधीचा गंडा दोन महिन्यात दुप्पट रकमेच्या अमिषापोटी सुमारे

 पाच ते सहा कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्या ३८ जणांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रारी दिली आहे.

दरम्यान या प्रकरणात गुंतवणूकदारांचा आकडा सुमारे ३०० च्यावर फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाईलवरील फिलिप्स या नावाने असणाऱ्या लिंकवरून गुंतवणूकदारांचा एक व्हॉट्स अप ग्रूप काढण्यात आला होता. त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेच्या काही टक्के रक्कम अगदी दुसऱ्या दिवसापासून गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होत होती.

यापैकी सुरुवातीस गुंतवणूक केलेल्या काही जणांना दुप्पट तसेच त्याहीपेक्षा जास्त रक्कम मिळाली. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला. आणि गुंतवणुकीची रकमही वाढत गेली.

पाच ते दहा हजार रुपयांपासून पाच लाखांपर्यंतची गुंतवणूक करणारांची संख्या सुमारे अडीचशे ते तीनशे असल्याचे या लोकांमधून सांगितले जात आहे. दरम्यान पैसे मिळणे बंद झाल्यानंतर फसवणूक झालेल्यांनी पोलिसात धाव घेतली.

अधिक माहिती न घेता केवळ फिलिप्स सारख्या नावावर विश्वास ठेऊन आम्ही गुंतवणूक केली, सुरुवातीस काही रक्कम मिळाल्याने विश्वास वाढत गेला. व शेवटी रक्कम मिळण्याचे बंद झाल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे गणेश जोगळेकर यांनी सांगितले.

नागरीकांनी आपले मेहनतीचे पैसे गुंतवताना खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे. आम्ही योग्य दिशेने तपास नक्की करू असे तपास अधिकारी दीपक गायकवाड यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments