आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी
यांना अज्ञात व्यक्तींकडून जिवे मारण्याची धमकी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)
सोलापूर : डॉ.अमीर मुलाणी यांना अज्ञात व्यक्तींकडून रजिस्टर पोस्टाने जिवे मारण्याची धमकी पत्रातून समाज सेवा बंद करण्याचा इशारा अन्यथा चार दिवसांत जिवे मारण्याची धमकी
करमाळा पोलीस ठाणे अदखलपात्र अहवाल गु.र.नं 1776/2023 भा. दं.वि. कलम 507 प्रमाणे फिर्यादी दाखल करण्यात आली आहे . डॉ.अमीर मुलाणी यांनी करमाळा पोलीसात धाव घेतली व करमाळा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला आहे.
पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत डॉ.अमीर मुलाणी यांना सुरक्षा व्यवस्थाची गरज आहे. ते आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संपुर्ण देशातील डॉक्टरच्या न्याय हक्कासाठी काम करत आहेत
व भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संपूर्ण देश भर काम पाहात आहेत व अन्यायाविरुद्ध आवाज ही खुप वेळा उठवला आहे. त्यांना सुरक्षा व्यवस्था मिळावी यासाठी महाराष्ट्रातून सर्व डॉक्टरांकडून प्रशासनाकडे सुरक्षाची मागणी केली जात आहे.


0 Comments