धक्कादायक प्रकार...उतावळा नवरा! बायको माहेरहून येत नसल्यानं संताप;
विरह सहन न झाल्याने उंदिर मारण्याचं विष केलं प्राशन
सध्या मुला-मुलींच्या जन्मदरामध्ये तफावत असल्यामुळे लग्न जमणे ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक लग्नाळू तरुण, त्यांच्या पालकांना ही समस्या भेडसावते आहे.
तर लग्न झालेल्यांच्याही समस्याही वाढू लागल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात एका लग्न झालेल्या तरुणानं बायको माहेरहून येत नसल्यानं रागाच्या भरामध्ये चक्क उंदिर मारण्याचं विष प्राशन केलं. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास मालवंडी (ता. बार्शी) येथे ही घटना घडली.
शिवाजी लिंबू वाघमारे (वय- २५) असे या तरुणाचे नाव आहे.यातील तरुण शिवाजी याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.
घरगुती कारणावरुन त्यांची पत्नी माहेरी गेली होती. ती परत येत नसल्याचे शल्य त्याला नेहमीच असायचे. यातून नेहमीच नैराश्य यायचे.
मंगळवारी त्याला विरह सहन झाला नाही. रागाच्या भरामध्ये आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्याने मालवंडी गावात राहत्या घरी घरात उंदिर मारण्यासाठी आणलेले औषध गुपचूप प्राशन केले.
थोड्यावेळाने त्रास होऊ लागला.आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्याला वैराग येथील सरकारी दवाखान्यात हलवले. येथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानुसार त्यांचे नातलग नागुराव कासूळकर यांनी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, रुग्ण शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


0 Comments