सांगोला येथील धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नुतन
पदाधिकाऱ्यांचा माजी नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या हस्ते सत्कार संपन्न
सांगोला /प्रतिनिधी: (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)
सांगोला येथील धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राजमाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माजी नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या हस्ते करण्यात आले.
मंडळाच्या नूतन पदाधिकारी अध्यक्षा सौ. ज्योती चोरमुले ,सचिव सुनीता मेटकरी ,खजिनदार माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, सल्लागार ॲड . संजीवनी खांडेकर यांचा पतसंस्था कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी बँकेच्या संचालिका शांता हाके, पतसंस्थेच्या संचालिका पूजा गाडेकर, संचालिका रेश्मा गावडे, सेक्रेटरी मनीषा हुंडेकरी, फायनान्सच्या सेक्रेटरी पल्लवी कांबळे, लिपिक माधुरी कांबळे या मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


0 Comments