google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या वतीने नागपंचमीच्या सणानिमित्त सर्पमित्रांचा सत्कार, मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

Breaking News

सांगोला येथील धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या वतीने नागपंचमीच्या सणानिमित्त सर्पमित्रांचा सत्कार, मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

  सांगोला येथील धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या वतीने नागपंचमीच्या


सणानिमित्त   सर्पमित्रांचा सत्कार, मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)

सांगोला /प्रतिनिधी: सांगोला येथील धनगर समाजसेवा महिला मंडळाच्या वतीने नागपंचमीच्या सणानिमित्त महिला मंडळाचे नूतन  पदाधिकारी अध्यक्षा सौ. ज्योती चोरमुले ,उपाध्यक्षा सौ कल्पना माने, सचिव सौ सुनीता मेटकरी, 

खजिनदार माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी ,सल्लागार ॲड . सौ. संजीवनी लवटे -खांडेकर यांचा मंडळाच्या सदस्याकडून सत्कार करण्यात आला. सांगोला तालुक्यातील सर्पमित्र संदेश पलसे, अकबर बागवान, समाधान होवाळ ,प्रशांत नकाते, प्रमोद डोईफोडे यांचाही या मंडळाच्या वतीने नागपंचमीनिमित्त सत्कार करण्यात आला. 

तसेच दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या  कार्यक्रमात सांगोला येथील बाळासाहेब लवटे व अर्चना लवटे यांचा सत्कार करण्यात आला होता. या लवटे कुटुंबाचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. 

या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा.चंद्रप्रभा गावडे तसेच अकबर बागवान यांनी मनोगत व्यक्त करीत नागपंचमीच्या सणाचे महत्त्व सांगितले .तसेच धनगर समाजसेवा महिला मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. 

मान्यवर महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पुजारी यांनी केले. या कार्यक्रमासाठी मंडळातील सर्व महिला पदाधिकारी, सदस्य व महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थितांचे आभार दिपाली सरगर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments