google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रात लवकरच अल्टरनेटिव्ह मेडिसिन कौन्सिलची स्थापना होणार आयुष भारतला शासनाचा ग्रीन सिग्नल

Breaking News

महाराष्ट्रात लवकरच अल्टरनेटिव्ह मेडिसिन कौन्सिलची स्थापना होणार आयुष भारतला शासनाचा ग्रीन सिग्नल

 महाराष्ट्रात लवकरच अल्टरनेटिव्ह मेडिसिन कौन्सिलची


स्थापना होणार आयुष भारतला शासनाचा ग्रीन सिग्नल

मुंबई प्रतिनिधी,  महाराष्ट्र राज्यात लवकरच अल्टरनेट मेडिसिन कौन्सिलची स्थापना होणार आहे

 अल्टरनेटिव्ह मेडिसिन कौन्सिल मुळे हजारो डॉक्टर रजिस्टर होणार असून सर्व अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरांना त्यांचे अधिकार प्राप्त होणार असून त्यांना त्यांचे हक्क मिळणार आहे आयुष भारत डॉक्टर असोसिएशन अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरांच्या न्याय आणि हक्कासाठी काही वर्षांपासून लढा उभा करत आहे

 अखेर त्यांच्या लढ्याला शासनाने ही ग्रीन सिग्नल दिलेला आहे आयुष भारत डॉक्टर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ. अमीर मुलानी तसेच अल्टरनेटिव्ह मेडिसिन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुतार यांचीही कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी कौन्सिल बाबत 

विशेष चर्चा कोल्हापूर येथे संपन्न झाली होती. कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ.सुतार यांना पत्र देऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मुंबई मंत्रालय यांच्याकडे विशेष चर्चा करण्यासाठी पाठवले होते. अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरांचे हक्क मिळवून देण्यासाठी

 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई या शाखेसोबत चर्चासत्र संपन्न झाले या चर्चासत्रात आयुष भारत डॉक्टर असोसिएशनला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी आश्वासन दिले यानंतर अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरांवरती बोगस डॉक्टर म्हणून कारवाई होणार नाही

 व पुढील अल्टरनेटिव्ह मेडिसिन कौन्सिल कामकाजासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे यामुळे अल्टरनेटिव मेडिसिन डॉक्टरांच्या न्याय आणि हक्कासाठी रात्रंदिवस लढत असणारी संघटना आयुष भारत डॉक्टर असोसिएशन या संघटनेचे कौतुक देशभरातून केले जात आहे.

Post a Comment

0 Comments