मुस्लिम समाजाला न्याय, हक्कासाठी चळवळ उभी करावी लागेल - शब्बीर अन्सारी तालुक्यातील मुस्लिम ओबीस व इतर ओबीसी समाजाला एकत्र आणून काम करू -
निहाल तांबोळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची आढावा बैठक व मार्गदर्शन संपन्न
सांगोला. (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज ) - मुस्लिम समाजाला न्याय, हक्कासाठी चळवळ उभी करावी लागेल असे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आढावा बैठकीमध्ये प्रतिपादन केले आहे.
यावेळी अन्सारी म्हणाले की, इतर समाज प्रमाणे मुस्लिम ओबीसी समाजाला देखील आपल्या न्याय हक्कासाठी चळवळ उभी करावी लागेल त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील, गावागावातील मुस्लिम ओबीसी समाजाला एकत्र यावे लागेल.
समता, न्याय, बंधुता या मूल्याच्या आधारावर आपल्याला काम करायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जी शिकवण दिली ती म्हणजे संघटित व्हा त्या धर्तीवर आपल्याला संघटित व्हावे लागेल.
त्याशिवाय आपला विकास होणार नाही. आणि हो..! जो इतिहासाने दिलेले धडे विसरतो, त्याला इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही.
म्हणून त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे अन्सारी म्हणाले. तर, तालुकाध्यक्ष निहाल तांबोळी म्हणाले की, सांगोला शहर व ग्रामीण भागातील मुस्लिम ओबीसी समाज व इतर ओबीसी समाजाला वारंवार येणार्या जात पडताळणी,
जातीचे दाखले व विविध प्रकारच्या शासकीय कागदपत्रांमध्ये येणार्या अडीअडचणी सोडविण्याकरीता तालुक्यातील सर्व ओबीसी समाजाला एकत्र आणून या संघटनेच्या मार्फत ते सोडविण्याचे काम करण्याचे निर्धार आम्ही केला
असून तालुक्यातील प्रत्येक ओबीसी समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकतीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही देतो असे तांबोळी म्हणाले. तर, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन प्रदेशाध्यक्ष मुशा मुर्शद म्हणाले की,
जात पडताळणी करिता संघटना तुमच्या सोबत असेल. तर संघटनेचे मंत्रालयीन शाहरुख मुलाणी म्हणाले की, मुल्ला मुलाणी समाजाचे जातीचे दाखले व जात पडताळणी साठी आवश्यक ते सर्व शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सोय केली जाईल.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीस अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी,युवा नेते गुफारन अन्सारी, प्रदेशाध्यक्ष मुसा मुर्शद, राज्य सचिव इसाक खडके, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, मार्गदर्शक शफी इनामदार, रफिक तांबोळी, शब्बीर बागवान, हाजी
बशीरभाई तांबोळी, शौकत खतीब, इरफान फारूकी, कायदेतज्ञ आयुब पटेल, सल्लागार सलीम तांबोळी, जुबेर मुजावर, अलमगिर मुल्ला, सरफराज खतीब सर, तोहीद मुल्ला, रफिक तांबोळी (कोळा), कय्युम अत्तार (घेरडी), रफिक शेख (गुरुजी), वाकी घेरडे आयाज मणेरी, असगर पठाण, नुर मणेरी,
बाकीर मुजावर (सर), शकील तांबोळी, प्रसिद्धी प्रमुख मिनाज खतीब, मोहसीन मुलाणी, हमीद बागवान, पत्रकार चाँद शेख व तालुकाध्यक्ष निहालभाई तांबोळी, तालुका उपाध्यक्ष अमजद बागवान, ता. उपाध्यक्ष फारूक आतार, ता. युवा अध्यक्ष अमजद मुलाणी,
शहर अध्यक्ष कादिर इनामदार, शहर युवा अध्यक्ष मोहसिन खाटीक, कार्याध्यक्ष गौस नाडेवाले, सचिव जाकीर तांबोळी, सह सचिव रफिक रमजान नदाफ, राजू तांबोळी, अबु सव्वालाखे, अन्सार बागवान, साहील खतीब, मुसा तांबोळी, सर्फराज तांबोळी, तोहिद शेख, मकसुद मणेरी, शाहरूख तांबोळी,
समीर तांबोळी, निहाल मुलाणी, समीर खाटीक, इम्तियाज शेख, अरिफ सय्यद व सांगोला तालुक्यातील सर्व सदस्य व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या आढावा बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारूक आतार तर आभार प्रदर्शन कादिर इनामदार यांनी केले


0 Comments