google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेगावच्या चिंच विसाव्यामध्ये चिंचेच्या झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Breaking News

शेगावच्या चिंच विसाव्यामध्ये चिंचेच्या झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शेगावच्या चिंच विसाव्यामध्ये


चिंचेच्या झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

वाढदिवस म्हटलं की मुलांचा, माणसांचा वाढदिवस आठवतो. पण सांगली जिल्यातील जत तालुक्यात शेगांव या गावात  चिंच विसावा ऍग्रोटुरिझम  येथे चिंचेच्या झाडांचा 23 वा वाढदिवस

 खूप मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला. चिंचेच्या झाडाची सजावट, केक, झाडाची पूजा, झाडाला फेटा, मिठाई, अल्पोपहार असा सर्व विधीवत वाढदिवस  साजरा झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे   उपस्थित होते. तसेच सांगोला तालुका कृषी अधिकारी  

शिवाजीराव शिंदे, सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्यू. कॉलेजचे संस्थापक  डी डी कोळसे पाटील, एस व्ही आर डी हायस्कूलचे  मुख्याध्यापक मा जहांगीर नदाफ हे उपस्थित होते.

चिंच विसाव्यामध्ये चिंचेच्या झाडांचा वाढदिवस या अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला .या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे व कार्यक्रमाचे कौतुक  उपस्थित मान्यवरांनी  केले. 

चिंच विसावा ऍग्रोटुरिझम चे मालक प्रल्हाद बोराडे यांनी चिंचेच्या झाडांचा दुष्काळातील कल्पतरू असा उल्लेख केला.

चिंच विसावा ऍग्रोटुरिझम येथे यांच दिवशी स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे उदघाटन पार पडले. बाळासाहेब लांडगे यांनी श्रीफळ वाढवले

 व  प्रल्हाद बोराडे यांची मोठी बहीण सौ सजाबाई हरिराम माने हिने फित कापली. इतर सर्व मान्यवर यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या

या स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये आता हॉलीबॉल,  फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, खो खो, विटी दांडू, कबड्डी, रगोली, गोट्या, रस्सीखेच व असे बरेच मैदानी खेळ खेळता येतील.

ट्रॅक्टर ट्रेन, टायर वरून चढणे, रस्सी वरून चढणे असे अजून मनोरंजनात्मक खेळ सुद्धा खेळता येणार आहेत.

मोबाईल च्या जमान्यामध्ये मैदानी खेळ लोप होत असताना या ठिकाणी मुलांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नदाफ सरांनी आनंद व्यक्त केला.

चिंच विसावा ऍग्रोटुरिझम हे थोड्याच कालावधीत नावारूपाला आलेले पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. 

या ठिकाणी ग्रामीण ठेवा जपला आहे. चुलीवरचे घरगुती जेवण, स्वतःच्या शेतातील भाज्या, टाकाऊ पासून ठिकाऊ संकल्पना, सेल्फी पॉइन्ट, 

निसर्ग रम्य वातावरण, झाडांची थंडगार सावली, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, औषधी वनस्पती, विविध पक्षी, स्विमिंग पूल, रेन डान्स, जुन्या वस्तूंचे संग्रहालय अशा भरपूर सुविधा आहेत.

चिंच विसावा म्हणजे खरोखर विसावा ,  या ठिकाणी  आल्यावर या शब्दाचा खरा अर्थ कळतो.या भागातील अतिशय सुंदर असे हे पर्यटन स्थळ आहे, जरूर एकदा भेट द्यावे अशी  आवाहन प्रल्हाद बोराडे यांनी केले

Post a Comment

0 Comments