google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ... दागिन्याची उधारी मागितल्याने शेटफळेत दोघांना भोसकले, हल्लेखोर पसार; सांगोला तालुक्यातील सात जणांवर गुन्हा

Breaking News

खळबळजनक ... दागिन्याची उधारी मागितल्याने शेटफळेत दोघांना भोसकले, हल्लेखोर पसार; सांगोला तालुक्यातील सात जणांवर गुन्हा

खळबळजनक ... दागिन्याची उधारी मागितल्याने शेटफळेत दोघांना भोसकले,


हल्लेखोर पसार; सांगोला तालुक्यातील सात जणांवर गुन्हा 
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

आटपाडी : ज्वेलर्समधून पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या दागिन्यांची उधारी मागितल्याबद्दल शेटफळे (ता. आटपाडी) येथील सराफ सुरेश जयवंत गायकवाड (वय ४२) व हेमंत गायकवाड (३४) या दोघांना चाकू व खंजीरने भोसकले.

तर, गायकवाड यांच्या चालकास बेदम मारहाण केली.

बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी जखमी गायकवाड यांनी कोळे (ता. सांगोला) येथील संशयित रमेश आलदर, रावसो आलदर, बिरा खरात, नेताजी सरगर व अनोळखी तिघे अशा सात जणांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सुरेश गायकवाड यांचे आटपाडीमध्ये शुभम ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे. या दुकानातून कोळे येथील एकाने सोने खरेदी केले होते. खरेदी केलेल्या सोन्याची काही रक्कम येणे बाकी होती. त्यामुळे गायकवाड हे काही महिन्यांपासून उधारीवर नेलेल्या ग्राहकांकडे पैशाची मागणी करत होते.


दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेटफळे येथे सुरेश गायकवाड यांच्या घरासमोर संशयित रमेश आलदर, रावसो आलदर, बिरा खरात, नेताजी सरगर आणि तिघे जण आले होते. सुरेश गायकवाड यांना पैसे देण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले. तेव्हा चाकूने त्यांच्या हातावर व पोटावर वार केले. गायकवाड यांच्या गाडीवरील चालकाला मारहाण केली.

तसेच, हेमंत गायकवाड हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावरही धारदार शस्त्राने वार केला. तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. सुरेश गायकवाड यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, त्यांचे मित्र बाळासाहेब जगदाळे यांची जीप (एमएच १० सीआर १२३) ची काच फोडून मोडतोड केली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

हल्ल्यातील जखमींवर आटपाडी येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी पद्मा कदम, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली. सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments