google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला भाजपा तालुका उपाध्यक्ष दिलीपराव सावंत यांची भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड व्हावी : आनंदराव फाटे

Breaking News

सांगोला भाजपा तालुका उपाध्यक्ष दिलीपराव सावंत यांची भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड व्हावी : आनंदराव फाटे

सांगोला भाजपा तालुका उपाध्यक्ष दिलीपराव सावंत


यांची भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड व्हावी : आनंदराव फाटे

सांगोला / प्रतिनिधी  (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क )

सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, भारतीय जनता पार्टीचे सांगोला तालुका उपाध्यक्ष दिलीपराव सावंत यांची भारतीय जनता पार्टीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड व्हावी असे मत भारतीय जनता पार्टीचे सांगोला शहराध्यक्ष आनंदराव फाटे यांनी व्यक्त केले आहे.

दिलीपराव सावंत हे गेली वीस वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम करत असून गेल्या सात वर्षांपासून भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदावर ते काम करीत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, सर्वसामान्य लोकांच्या मनामनात पोहोचलेले दिलीपराव सावंत यांच्याकडे घेरडी गटाचे भावी 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहिले जाते. त्यांच्याकडूनसर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. ते सांगोला मंगळवेढा छावणी चालक संघटनेचे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या सांगोला तहसील कार्यालय समोर जनावरांसह आंदोलन सुरू आहे.

 सर्वसामान्यांची कामे करणे, गोरगरिबांना मदत करणे, तरुण मंडळांना मदत करणे, मुलींना सायकली वाटप इत्यादीसमाजोपयोगी उपक्रम राबवून भारतीय जनता पार्टी पक्ष वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.

 सध्या ते सांगोला शहरांमध्ये राहून काम करीत आहेत... त्यामुळे भाजपमधील जवळजवळ ९०% पदाधिकाऱ्यांचा दिलीपराव सावंत यांना भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष पद मिळावे यासाठी पाठिबा आहे. दिलीपराव सावंत हेच भाजपा तालुकाध्यक्ष व्हावी अशी सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

 त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दिलीपराव सावंत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीचे सांगोला तालुका अध्यक्षपद देण्यात यावे असे मत भारतीय जनता पार्टीचे सांगोला शहराध्यक्ष आनंदराव फाटे यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments