google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ..मुलगा-सुनेच्या वादात मध्यस्थी भोवली, घाव वर्मी बसल्याने पित्याने तडफडून प्राण सोडले

Breaking News

धक्कादायक ..मुलगा-सुनेच्या वादात मध्यस्थी भोवली, घाव वर्मी बसल्याने पित्याने तडफडून प्राण सोडले

धक्कादायक ..मुलगा-सुनेच्या वादात मध्यस्थी भोवली,


घाव वर्मी बसल्याने पित्याने तडफडून प्राण सोडले

मुलगा आणि सुनेमध्ये सुरु असलेल्या घरगुती भांडणात मध्यस्थी करणं बापाला चांगलंच महागात पडलं आहे. वादावेळी सूनबाईला राग आल्याने ती घरातून निघून गेली. 

याच गोष्टीचा राग आलेल्या संतप्त झालेल्या मुलाने बापाच्या डोक्यात लोखंडी पहार टाकून त्याचा खून केला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंजारझाडी जवळील साबरसोंडा गावात रात्रीच्या वेळेस प्रकाश शामराव व त्याची पत्नीमध्ये घरगुती 

कारणावरून भांडण सुरू होते. प्रकाशचे वडील शामराव भिवसन जगताप हे त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी प्रकाशची पत्नी घरातून निघून गेली.

याच गोष्टीचा राग आल्याने प्रकाशने घरातील जुनी लोखंडी पहार उचलली व ती थेट वडिलांच्या कानावर मारली. लोखंडी पहारीचा 

वार वर्मी बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यात शामराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच धुळे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, साक्री पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांनी पथकासह घटनास्थळावर धाव घेत माहिती जाणून घेतली. 

दरम्यान घटनेचे गांभीर्य पहाता जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आरोपीस तात्काळ बेड्या ठोकण्याचे आदेश दिले.

Post a Comment

0 Comments