google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..'चांद्रयान-3' चा चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश

Breaking News

मोठी बातमी..'चांद्रयान-3' चा चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश

मोठी बातमी..'चांद्रयान-3' चा चंद्राच्या


कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

भारताच्या मिशन चांद्रयान मोहिमेला यश मिळालं आहे. चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. 'मॉक्स इस्ट्रॅक मी चांद्रयान-3, मला चंद्राचं गुरुत्वाकर्षण जाणवत आहे,' असं ट्वीट इस्रोने केलं आहे.

चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर आता पुढची मिशन 6 ऑगस्ट 2023 ला रात्री 11 वाजता पूर्ण होणार आहे, यामध्ये चांद्रयान-3 त्याची कक्षा आणखी कमी करणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोनं 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नियोजित वेळेनुसार चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं.

 तेव्हापासून आत्तापर्यंत चांद्रयानानं सुरळीत प्रवास केला. गेल्या तीन आठवड्यांपासून इस्रोचं हे यान पृथ्वीपासून दूर अंतराळात जात आहे. 1 ऑगस्ट रोजी यानानं क्रिटिकल ट्रान्स-लुनार इंजेक्शन (टीएलआय) पूर्ण केले.

चांद्रयान-3 सध्या ताशी 37 हजार 200 किलोमीटर वेगानं चंद्राकडे जात आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ते त्याच्या पृष्ठभागापासून सुमारे 40 हजार किलोमीटर दूर आहे. अंतराळ संस्थेनं यापूर्वी सांगितले आहे की भारताच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेची स्थिती पूर्णपणे सामान्य आहे. 23 ऑगस्ट रोजी यान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.

चंद्राच्या प्रारंभिक कक्षेत पोहोचल्यानंतर ते इच्छित 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत खाली आणण्यासाठी इस्रोला अनेक मेन्युव्हर्स करावे लागतील. इस्रोनं अद्याप याबाबत अधिकृतपणे भाष्य केलं नसलं तरी, चांद्रयान-3 गोलाकार कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी

 अंतराळ संस्था किमान चार मून-बाउंड मेन्युव्हर्स करेल, असा अंदाज आहे. जर सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली तर 23 ऑगस्ट रोजी यानातील लँडर चंद्रावर उतरेल. लँडिंगनंतर रोव्हर लँडरपासून वेगळं होईल आणि डेटा गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.

Post a Comment

0 Comments