google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात भीषण अपघात; चार जण ठार

Breaking News

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात भीषण अपघात; चार जण ठार

 सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात भीषण अपघात; चार जण ठार


मोहोळ जवळच्या यावली गावाजवळ माल वाहू ट्रक आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे.

रांजणगावातील काही महिला भाविक कार मधून तुळजापूर साठी निघाल्या असता पुणे सोलापूर महामार्गावर यावली गावाच्या जवळ सोलापूरला जाणाऱ्या मालवाहू ट्रकला कारची मागून जोरदार धडक झाली. 

धडक एवढी जोरदार होती की त्यात तीन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला.तर चार महिला भाविक जखमी झाले आहेत. 

घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह गाडीतून काढण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून मृतांची ओळख पेटवण्याचे काम सुरु आहे. 

या अपघातात तीन महिला भाविक जागीच ठार झाल्‍या. एका महिलेचा सोलापूर सिव्हिल रुग्णालयात उपचारा दरम्‍यान मृत्यू झाला. या अपघातात चार महिला भाविक जखमी झाल्‍या आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज (बुधवार) दि.२३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजता मौजे मोहोळ हद्दीत, हॉटेल सरगम समोर पुण्याकडून सोलापूरकडे येणाऱ्या रोडने 

ईको कार क्र. एम.एच.४६ / ए.पी.४१२० हि सोलापूरच्या दिशेने जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनास धडक लागल्याने त्यात ईको कार मधील चालक 

१) आदमअली मुनावरअली शेख वय ३७ व बसलेले 

२) हिराबाई रामदास पवार वय ७५, 

३) कमलाबाई मारूती वेताळ (वय ६०) रा. रांजनगाव मशीद ता. पारनेर हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले.

 ४) द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४० रा. राजनगाव मशीद या सोलापूर सिव्हील हॉस्पीटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर मृत झाल्‍या.

तसेच सदर ईको कार मधील १) बाळी बाबु पवार (वय २७) छकुली भिमा पवार (वय.२७) 

साई योगीराज पवार (वय ७ वर्ष) मंदाबाई नाथा पवार (वय ५२) सुरेखा भारत मोरे (वय ४५) बायजाबाई रामदास पवार (वय ६०) सर्व राहणार राजनगाव मशीद हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर 

सोलापूर सिव्हील हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तरी मोहोळ पोलीस ठाण्यात टोलनाक्याचे पेट्रोलींग अधिकारी मलिकार्जुन बळीराम बजुलगे यांनी मोटार अपघाताची खबर दिली आहे.

Post a Comment

0 Comments