google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कौतुकास्पद! चांद्रयान- 3 मोहिमेत सांगोला तालुक्यातील तरुणाचंही योगदान

Breaking News

कौतुकास्पद! चांद्रयान- 3 मोहिमेत सांगोला तालुक्यातील तरुणाचंही योगदान

 कौतुकास्पद! चांद्रयान- 3 मोहिमेत सांगोला तालुक्यातील तरुणाचंही योगदान


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)

चांद्रयान मोहिमेमध्ये सांगोला तालुक्यातील एका उद्योजकाचे मोठे योगदान असल्याचे समोर आले आहे. या उद्योजकाने पुरवलेल्या सिल्वर आणि कॉपर पासून तयार केलेल्या ट्यूबचा वापर या चांद्रयानामध्ये करण्यात आला आहे.

या ट्यूबमुळे चांद्रयानाचे वजन कमी होण्यास मदत झाली आहे. शिवाय चांद्रयानाला वेळोवेळी देण्यात आलेले सिग्नल देखील व्यवस्थित पोहोचण्यास मदत झाली आहे. अत्यंत गरीब परस्थिती मधून आलेल्या शेखर भोसले या उद्योजकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चांद्रशेखर भोसले यांचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे चांदीपासून इलेक्ट्रिक उपकरणे बनवण्याचा व्यवसाय आहे. गेल्या अकरा वर्षांपासून ते इस्त्रोला चांदी आणि कॉपर पासून बनवलेली विविध उपकरणे पुरवतात.

चांद्रयान मोहिमेत देखील काॅपर आणि चांदी पासून बनवलेल्या 50 ट्युब तयार करून त्या इस्त्रोला दिल्या आहेत. त्या सर्व ट्युबचा वापर चांद्रयानामध्ये करण्यात आला आहे. शेखर भोसले हे मूळचे सांगोला तालुक्यातील खवासपूर गावचे आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सांगोल्यात झाले आहे.

आजही त्यांचे आई-वडील व बंधू खवासपूर गावात शेती करतात. मोहीम यशस्वी होत असल्याने सांगोला तालुक्यात शेखर भोसले यांचे कौतुक केले जात आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही शेखर भोसले यांच्या या कामगिरीचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments