google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक.. सांगोला - लोटेवाडी -महूद रोडवर अपघात, वृद्धा जागीच ठार

Breaking News

धक्कादायक.. सांगोला - लोटेवाडी -महूद रोडवर अपघात, वृद्धा जागीच ठार

 धक्कादायक.. सांगोला - लोटेवाडी -महूद रोडवर अपघात, वृद्धा जागीच ठार


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

देवदर्शन आटपून घराकडे परतताना चालकाचा ताबा सुटून धोकादायक वळणावर रिक्षा पलटी होऊन ७५ वर्षीय वृद्धा जागीच ठार झाला तर चार भाविक जखमी झाले.

 हा अपघात मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास लोटेवाडी - महूद रोडवर सांगाेला तालुक्यात अचकदाणी गावाजवळ घडला.चांगुणा अर्जुन मोहिते (७५, रा. करकंब, ता. पंढरपूर) असे मरण पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

 मीना रामदास माने (४८), सिध्दू अर्जुन मोहिते (४०, रा. करकंब, ता. पंढरपूर), नंदा सुभाष पवार(५४, रा. मंगळवेढा), लक्ष्मी गणेश चौगुले (३५ रा.दौंड, जि.पुणे) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अनिल रामदास माने (रा. करकंब, ता. पंढरपूर) हे आजी चांगुना, आई मीना, मामा सिद्धू, मावशी नंदा व मावस बहीण लक्ष्मी असे पाच जण मिळून मंगळवारी सकाळी पंढरपूर येथून चालक राहुल हनुमंत पवार( रा. जुना कराड नाका पंढरपूर ) यांच्या रिक्षा (एम एच १३- सीटी- ४२०४) तून पंढरपूर तालुक्यात लोटेवाडी येथील म्हसोबाच्या देवदर्शनासाठी गेले.

देवदर्शन आटोपून दुपारी ४.३० च्या सुमारास परतत असताना आचकदाणीजवळ वळणावर ताबा सुटून रिक्षा रोडच्या खाली पलटी झाली. अपघातात डोकीस मार लागून चांगुना जागीच मरण पावल्या तर चौघे जखमी झाले. रिक्षा चालक राहुल पवार यांचेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments