google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेची प्रतीक्षा

Breaking News

सांगोला रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेची प्रतीक्षा

 सांगोला रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेची प्रतीक्षा




सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

सध्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जेऊर ,दुधनी सोलापूर पंढरपूर व कुर्डूवाडी या पाच रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे मात्र यातही सांगोला रेल्वे स्थानक हे दुर्लक्षित राहिले आहे .

सांगोला तालुक्यात असणारी प्रसिद्ध बोर, डाळिंबे, द्राक्षे, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा खिलार जनावरांचा बाजार, याकरिता अनेक देशातील व्यापारी ,शेतकरी यांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सांगोला तालुक्यातील डाळिंब ,जनावरांचा बाजार व येथील असणारी मोठी बाजारपेठ महत्वपूर्ण असलेने सांगोला रेल्वे स्टेशन अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. 

या रेल्वे स्टेशनवर कलबुर्गी कोल्हापूर एक्सप्रेस यासह एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना पंढरपूर स्टेशनची वाट धरावी लागते. याशिवाय या ठिकाणी एक्सप्रेस गाड्या थांबवाव्यात अशी मागणी गेल्या दहा महिन्यांपासून शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने सातत्याने केली आहे.

 सांगोला शहर हे तालुक्याचे मुख्य केंद्र असून याठिकाणी देशभरात अनेक ठिकाणी किसान रेल्वे यापूर्वी गेलेल्या आहेत. सांगोला स्टेशन वरून मंगळवेढा , माळशिरस ,जत ,आटपाडी येथील प्रवासी सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करीत असतात. सांगोल्यात शैक्षणिक संस्था, प्रशस्त बाजारपेठ, 

मार्केट यार्ड ,राष्ट्रीय महामार्ग, असल्याने तालुक्यातील 110 हून अधिक गावांशी जोडले गेलेले आहे. तालुक्याची लोकसंख्या साडेतीन लाखाहून अधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर ,पुणे, यशवंतपुर (बेंगलोर )नागपूर ,धनबाद कर्नाटक ,आंध्र प्रदेश भागात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना 

सांगोला रेल्वे स्टेशन जवळचे आहे अशातच केंद्र शासनाने सोलापूर रेल्वे विभागातील पंढरपूर, दुधनी ,जेऊर ,सोलापूर ,कुर्डूवाडी असे 5 रेल्वे स्टेशन आणि पुणे विभागातील 16 रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत समावेश केला आहे .

 सांगोल्यासारख्या महत्त्वाचे रेल्वे स्थानक मात्र दुर्लक्षित आहे मागील 12- 15 वर्षांपूर्वी ब्रॉडगेज रूपांतर वेळी जुने रेल्वे स्टेशन पाडून नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात आली. त्यामुळे या सांगोला रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेत सहभाग होणे आवश्यक आहे अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने रेल्वे विभागाकडे केली आहे.

चौकट

स्थानकाचा विकास करावा

बारा ते पंधरा वर्षांपूर्वी सांगोला स्टेशन नूतनीकरण करण्यात आले  या स्टेशनला अनेक रेल्वेचे महाप्रबंधक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी भेट देऊन उत्कृष्ट स्टेशन म्हणून नोंद घेण्यात आली. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शंभराव्या किसान रेल्वेचा ऑनलाइन सांगोला रेल्वे स्थानकात शुभारंभ केला. 

मात्र तरीही येथील विकास करण्यात आला नाही प्रवाशांची मागणी व संख्या मोठ्या प्रमाणात आहे .त्यामुळे शासनाने अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत समावेश करून सांगोला रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करावा.:-

नीलकंठ शिंदे सर, संस्थापक अध्यक्ष -शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना ,सांगोला.

Post a Comment

0 Comments