सांगोला नगरपरिषद करणार पथविक्रेत्यांसाठी शिबिराचे आयोजन स्वनिधी से
समृद्धी अंतर्गत पथ विक्रे त्यांना मिळणार आठ योजनेचा लाभ
सांगोला / शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज: कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावला.
त्यांना उभारी मिळण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेची सुरवात करण्यात आली. यामध्ये शहरातील भाजी, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजीपाव,
अंडी, कापड, चप्पल, उत्पादित वस्तु रस्त्यावरील केशकर्तन, चर्मकार, पानपट्टीधारक इत्यादींना व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भागभांडवलाचा पतपुरवठा केला जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या सहकार्याने ही योजना राबविली जात आहे.
सांगोला नगरपरिषदेने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) अंतर्गत शहरातील ३५८ इतक्या पथविक्रेत्यांना प्रथम
( र.रु.१०,०००/-) तर १४९ पथविक्रेत्यांना द्वितीय (२.रु.२०,०००/-) व १८ इतक्या पथविक त्यांना तृतीय (र.रु.५०,०००/-) कर्ज पुरवठा शहरातील विविध बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
ज्या पथ विक्रेत्यांनी पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) अंतर्गत लाभ घेतला आहे अशा पथ विक्रेत्यांकरिता शासन स्तरावरून
१) प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना
२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
३) प्रधानमंत्री जन-धन योजना व रूपे कार्ड
४) इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणीकरण
५ ) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
६) एक राष्ट्र एक राशन कार्ड
७) जननी सुरक्षा योजना
८) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या आठ योजनांचा लाभ मिळणार आहे.
याकरिता नगरपरिषद स्तरावरून दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी१०.०० वाजता नगरपरिषद आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी शहरातील पात्र पथ विक्रेत्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे अवाहन डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी, नगरपरिषद सांगोला यांनी केले आहे.
"स्वनिधी से समृद्धी अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये शासनाच्या आठ योजनांचा लाभ व माहिती मिळणार आहे. या शिबिरामध्ये शहरातील विविध बँका व शासकीय यंत्रणा सहभागी होणार आहेत, तरी शहरारतील सर्व पथ विक्रेत्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.'
डॉ. सुधीर गवळी सांगोला नगरपरिषद सांगोला मुख्याधिकारी


0 Comments