google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय महाराष्ट्र खान्देश जीवनगौरव सन्मान” २०२३ पुरस्कार जाहीर

Breaking News

श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय महाराष्ट्र खान्देश जीवनगौरव सन्मान” २०२३ पुरस्कार जाहीर

 श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक  प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना



“राष्ट्रीय महाराष्ट्र खान्देश जीवनगौरव सन्मान” २०२३ पुरस्कार जाहीर    

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)

शिरभावी  :-      सांगोला तालुक्यातील शिरभावी गावचे युवक सुपुत्र व श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक 

 प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय महाराष्ट्र खान्देश जीवनगौरव सन्मान” २०२३ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . हा पुरस्कार जाहीर झाल्याने श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 प्रसिद्ध मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी सन्मानार्थ माऊली सेवा फाउंडेशन, जळगाव, जय महाकाली कलावंत सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, जळगाव, कुसूमताई फाउंडेशन, जळगाव, समृद्धी प्रकाशन, सिंधुदुर्गं  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सामाजिक, कला साहित्य एकता संमेलन, जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. 

या संमेलनात देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्य व इतर क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय संमेलनात देण्यात येणारा यंदाचा “राष्ट्रीय महाराष्ट्र खान्देश जीवनगौरव सन्मान” २०२३ पुरस्कार प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे . 

 शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, साहित्य व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठित समजला जाणारा  पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती मा.डॉ.बी.एन. खरात यांच्या कडून  पत्राद्वारे देण्यात आली आहे . प्रसिद्ध मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी सन्मानार्थ माऊली सेवा फाउंडेशन, जळगाव, 

जय महाकाली कलावंत सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, जळगाव, कुसूमताई फाउंडेशन, जळगाव, समृद्धी प्रकाशन, सिंधुदुर्गं  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सामाजिक, कला साहित्य एकता संमेलन, जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या

 व्यक्तिंना “राष्ट्रीय महाराष्ट्र खान्देश जीवनगौरव सन्मान” २०२३ या पुरस्काराने गौरविले जाते.  या राष्ट्रीय संमेलनात देण्यात येणाऱ्या “राष्ट्रीय महाराष्ट्र खान्देश जीवनगौरव सन्मान” २०२३ पुरस्कारासाठी  प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी अनेक  व्यक्तींची निवड केली जाते. 

या व्यक्तींमध्ये प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची निवड झाली आली आहे ही खरोखरच खूप अभिमानाची व  कौतुकाची बाब आहे . त्यांना या राष्ट्रीय संमेलनात मा. सुनिल गोडबोले  ( सुप्रसिद्ध अभिनेते ), डॉ. सतीश भास्करराव पाटील, मा. पालकमंत्री जळगाव यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

       प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांनी गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप, वृक्षारोपण, वृक्षवाटप उपक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम, शालेय स्पर्धांचे आयोजन व इतर विविध उपक्रम राबविले आहेत. ही कामगिरी पाहून  त्यांची या पुरस्कारासाठी निवड  केली आहे . 

या पुरस्काराचे स्वरूप  सन्मानचिन्ह,  गौरवपत्र,  मेडल,  फेटा, श्रीफळ असे आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा वार शनिवार दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०३.०० वा. अल्पबचत भवन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव या ठिकाणी पार पडणार आहे .

 अशी माहिती मा. डॉ.बी.एन. खरात  यांच्याकडून देण्यात आली आहे. प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय महाराष्ट्र खान्देश जीवनगौरव सन्मान” २०२३  हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे व त्यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे .

Post a Comment

0 Comments