google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्याचे माजी आमदार के. गणपतराव देशमुख यांचे नातू कार अपघातातून डॉ. अनिकेत देशमुख बालंबाल बचावले किरकोळ जखम झाली

Breaking News

सांगोला तालुक्याचे माजी आमदार के. गणपतराव देशमुख यांचे नातू कार अपघातातून डॉ. अनिकेत देशमुख बालंबाल बचावले किरकोळ जखम झाली

 सांगोला तालुक्याचे माजी आमदार के. गणपतराव देशमुख यांचे नातू कार


अपघातातून डॉ. अनिकेत देशमुख बालंबाल बचावले किरकोळ जखम झाली

सांगोला तालुक्याचे माजी आमदार के. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांची कार बुधवारी (दि. १६) रात्री ११ वाजण्याच्या समारास टेंभुर्णी- पंढरपूर या महामार्गावर गुरसाळे गावाजवळ झाडाला धडकली.

 या अपघातातून डॉ. देशमुख हे बालंबाल बचावले असून, त्यांना किरकोळ जखम झाली आहे.

डॉ. देशमुख हे आपल्या कारने पुणे येथे गेले होते. तेथून परत एकटेच सांगोला येथे जाण्यासाठी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी मार्गे पंढरपूरकडे येत होते. 

या दरम्यान पंढरपूरपासून जवळच गुरसाळे गावाजवळ त्यांचा कारवरील ताबा सुटला

आणि कार महामार्गाच्या उजव्या बाजूला एका झाडाला जोरात धडकून थांबली. सतीश गुटाळ यांच्या घराजवळ हा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.

 कारमधील एअर बॅग उघडल्या गेल्याने डॉ. देशमुख हे बालंबाल बचावले. त्यांच्या ओठाला किरकोळ जखम झाली.

अपघाताच्या जोरदार आवाजाने परिसरातील लोक धावत आले. तात्काळ त्यांनी डॉ. देशमुख यांना मदत व विचारपूस केली. ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात येण्याची विनंतीही केली. 

मात्र, फारसे काही लागले नसल्याने डॉ. देशमुख यांनी त्यास नकार दिला. थोड्या वेळाने डॉ. देशमुख यांनी भटुंबरे येथील राजू शेंबडे यांना त्यांची कार घेऊन बोलावले 

व त्या कारने ते सांगोलाकडे रवाना झाले. सकाळी त्यांची अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आली.

Post a Comment

0 Comments