google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना...एकाच दिवसात 17 रुग्णांचा मृत्यू : प्रशासन हादरले

Breaking News

धक्कादायक घटना...एकाच दिवसात 17 रुग्णांचा मृत्यू : प्रशासन हादरले

धक्कादायक घटना...एकाच दिवसात 17 रुग्णांचा मृत्यू  : प्रशासन हादरले


 येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात एकाच दिवसात 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासन हादरले आहे. रुग्णालय प्रशासनाने या गोष्टीला दुजोरा दिला

 असला तरी त्यावर स्पष्टीकरण देखील दिले आहे. पण काहिजरी असले तरी शासन या प्रकरणाला कश्या पद्धतीने घेते हे पाहणे ऑस्त्युक्याचे ठरणार आहे.

यातील 13 रुग्ण हे आय सी यू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते, रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, 

काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे,

मात्र सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे,

10 तारखेला एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते, 

आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री यांचे ठाणे जिल्हा, मुख्यमंत्री यांची ठाणे महानगरपालिका, त्यात असलेली वर्षानुवर्षांचया सत्ता आणि त्याच महानगरपालिकेचे हे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल,

गेल्याच मिळत मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन ठाण्यात केले होते, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी 

देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न निर्माण होतोय

Post a Comment

0 Comments