google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व. गणपतराव देशमुख यांनी वंचित आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवून आणली असे गौरवोद्गार देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार

Breaking News

स्व. गणपतराव देशमुख यांनी वंचित आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवून आणली असे गौरवोद्गार देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार

स्व. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण आणि महाविद्यालयाचा नामांतर सोहळ्यात


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

सांगोला : स्व. गणपतराव देशमुख यांनी तब्बल ५५ वर्षाहून अधिक काळ त्यांनी एकाच पक्षातून आणि एकाच मतदारसंघातून शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि वंचित लोकांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचले.

खऱ्या अर्थाने स्व. गणपतराव देशमुख यांनी वंचित आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवून आणली असे गौरवोद्गार देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी काढले. 

सांगोला येथे स्व. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण आणि महाविद्यालयाचा नामांतर सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, श्रीमती रतनबाई देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, खा.रणजीतसिंह निंबाळकर, खा. संजयकाका पाटील, आ. शहाजी पाटील, आ. बबनराव शिंदे, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, आ. संजय शिंदे, आ. यशवंत माने,

आ. समाधान आवताडे, आ.राम सातपुते, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माजी आ. दीपक साळुंखे पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोहोतेडॉ. बाबासाहेब देशमुख, शहाजी पवार, माजी मंत्री महादेव जानकर,

माजी मंत्री राम शिंदे, प्रा. शिवाजीराव काळूंगे, बाळाराम पाटील, वैभव नायकवडी, जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, आजी, माजी आमदार आणि खासदार तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शरद पवार यांनी स्व. गणपतराव देशमुख यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. १९६२ पासून सतत विधिमंडळात त्यांनी आपल्या मतदार संघातील तसेच राज्य भारतील शेतकरी कामगार कष्टकरी आणि वंचित लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला.

आपल्या मतदार संघात कुठेच कापसाचे उत्पादन होत नसताना त्यांनी राज्यात नव्हे तर देशात एक आदर्शवत सूतगिरणी चालवली. सामान्य लोकांची तळमळ, स्वच्छ चारित्र्य, निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून स्व गणपतराव देशमुख राज्याला परिचित होते.

राज्यातील आटपाडी, जत, कवठे महांकाळ आणि सांगोला या दुष्काळी तालुक्याचा कायापालट झाला पाहिजे ही त्यांची कायम भूमिका होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकांची सेवा केली.

 आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्यापासून नेहमीच आपल्याला प्रेरणा मिळेल असेही यावेळी शरद पवार यांनी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी इतर कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे कटाक्षाने टाळलेले दिसून आले.

यावेळी प्रास्ताविक सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विठ्ठल शिंदे यांनी केले. तर शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

खासदार शरद पवार व दीपक साळुंखे-पाटील यांची बंद खोलीत झाली चर्चा -

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, राष्ट्रवादीत दोन गट पडले किंवा अजित पवारांनी वेगळी चूल मांडली अशा चर्चा दररोज होत असताना सांगोला दौऱ्यावर असलेल्या खासदार शरद पवार यांनी नियोजित कार्यक्रमापूर्वी सध्या अजित पवार गटात असलेले पण कधीकाळी

 खा. शरद पवारांचे अत्यंत खास असलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या कार्यालयाला भेट देऊन तब्बल अर्धा तास त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेमध्ये नक्की काय झाले यावर तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू होती.

पवारांवर टीका करणारे आमदार शहाजी पाटलांनी घेतले पवारांचेच दर्शन -

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी पवार कुटुंबावर विशेषतः अजित पवार व शरद पवार यांच्यावर राजकीय टीकाटिप्पणी मोठ्या प्रमाणात केली होती. आज या कार्यक्रमात एकत्र झाल्यानंतर आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवारांचे वाकून दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments