google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... अवैध वाळू उपशाला लगाम लावण्यासाठी राज्यात ७०० वाळू डेपो सुरू करणार - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Breaking News

मोठी बातमी... अवैध वाळू उपशाला लगाम लावण्यासाठी राज्यात ७०० वाळू डेपो सुरू करणार - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

मोठी बातमी... अवैध वाळू उपशाला लगाम लावण्यासाठी


राज्यात ७०० वाळू डेपो सुरू करणार - महसूलमंत्री राधाकृष्ण  विखे 

अवैध वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने नवीन वाळू धोरण अंमलात आणले. त्यामुळे जनतेला माफक दरात घरपोच वाळू मिळणार आहे.

 वाळू तस्करीला लगाम लावण्याबरोबरच गुंडगिरी मोडीत काढली जाणार आहे. राज्यात 700 वाळू डेपो सुरू करायचे असून त्यासाठी अधिकाऱ्यांना 31 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. 

ज्यांना जमणार नाही, त्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करणार असल्याचा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.

लवकरच तालुक्यातील सुरेगाव व कुंभारी येथील वाळू डेपो सुरू होणार असून यावेळी ना. राधाकृष्ण विखे म्हणाले कि, कोपरगाव तालुक्यात अगोदरच एवढे अनाधिकृत डेपो सुरू आहे. 

ते सगळे आपण मोडून काढू, राज्यात 700 वाळू डेपो सुरू करायचे आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांना महिनाभराचा अल्टिमेटम दिला आहे. ज्यांना जमणार नाही,

 त्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले. लोकांना सहाशे रुपयांत दिवसा वाळू मिळू लागली आहे.

स्वतःचा इंटरेस्ट बाजूला ठेवून थोडे निर्भीड झाले तर हे काम शक्य आहे, असेही ते म्हणाले. राज्यात वाळू माफियांची गुन्हेगारी वाढली होती.

 सामान्य व्यक्तीला कमी दरात वाळू मिळत नव्हती. वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. त्यावर राज्याने हे नवीन धोरण जाहीर केले. 

600 रुपये ब्रासने सर्वसामान्य नागरिकांना वाळू मिळणार आहे. बांधकाम व्यवसायिक घर बांधणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या नव्या वाळु धोरणामुळे ग्राहकांना 600 रुपये ब्रासने वाळू मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments