महूद ग्रामपंचायतीला टक्केवारीचे ग्रहण कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त होऊनही विकासापासून गाव दूर
महुद प्रतिनिधी –सातत्याने शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या महूद ग्रामपंचायतीला टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त होऊनही विकासापासून गाव दूर आहे.
ग्रामविकासा ऐवजी टक्केवारीत गुंग असलेल्या महूद ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याबरोबरच अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,
असे डॉ.गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणीचे संचालक व माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र बाजारे यांनी
ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीवर काढलेल्या जनआक्रोश मोर्चाला संबोधित करताना सांगितले.
येथील ग्रामपंचायतीचे आठ विरोधी सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांसाठी
आज महूद ग्रामपंचायतवर दिलीप नागणे व इतर आठ सदस्यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा समोर बोलताना महेंद्र बाजारे पुढे म्हणाले की, पिण्याच्या पाण्यासाठी विविध योजना असतानाही ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरत आहे.
शिरभावी पाणीपुरवठा योजनेबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाच काही माहीत नसल्याचे दिसून आले.महूद ग्रामपंचायतीची सत्ता सातत्याने शेतकरी कामगार पक्षाकडे आहे.
नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे ग्रामपंचायतीचे आद्य कर्तव्य आहे. नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत टाळाटाळ करते आहे. निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते अंगद जाधव बोलताना म्हणाले की, ग्रामस्थ पाण्याची मागणी करत असताना ग्रामपंचायत प्रशासन शिरभावी योजना बंद आहे,
पाईपलाईन खराब आहे,तिथे विजेचा प्रश्न आहे असे सांगून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते.
मात्र आंदोलनाचा इशारा देताच योजना तात्काळ सुरू करावी लागली. ग्रामपंचायत दाखले देताना
सामान्यांना वेठीस धरले जाते.तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी व नेत्यांनी सांगताच कोणालाही दाखले दिले
जातात.आंदोलनामुळेच प्रश्न सुटणार असतील तर आम्ही हजार वेळा आंदोलन करायला तयार आहोत
असे अंगद जाधव यांनी सांगितले.यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य विजय कोळेकर यांनी
या अडीच वर्षात झालेल्या ग्रामपंचायतीच्या विकास कामांची चौकशी करावी अशी मागणी केली.
तर अरविंद पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्यांना वाचा फोडताना विकास कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप केला.
यावेळी नवनाथ येडगे,ग्रामपंचायत सदस्य गणेश लवटे,सामाजिक कार्यकर्त्या श्लेषा कारंडे यांनीही विचार व्यक्त केले.
मोर्चामध्ये ग्रामपंचायत सदस्य दिलीप नागणे, भाग्यश्री बाजारे,गणेश लवटे,यशवंत खबाले,रोहिणी चव्हाण,विद्या कांबळे,
वनिता कोळेकर,सुनीता कांबळे,अंगद जाधव,अनुसया जाधव,ओंकार लवटे,अरुण नागणे, बाबुराव नागणे,सचिन जाधव,अरुण चव्हाण,किरण
चव्हाण,नामदेव कोळेकर,संतोष पवार,नवनाथ सरतापे,भारत मेटकरी,नैनेश कांबळे, संजय कोळेकर,संजय चव्हाण,
धनाजी कांबळे यांचेसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मोर्चेकरांच्या वतीने ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब शिंदे व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत हुले यांना निवेदन देण्यात आले.
चौकट – मोर्चातील प्रमुख मागण्या
* स्वच्छ व नियमित-वेळेवर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा.
* गावातील कचऱ्याचे ढीग उचलून गावात स्वच्छता करावी.
* येथील मुख्य चौकात एसटी स्टँड व्हावे.
* बेघर वसाहती मध्ये घंटागाडी सुरू करावी.
* विकास कामे दर्जेदार करावीत.
* तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्यात व नादुरुस्त गटारी दुरुस्त कराव्यात.
* खराब रस्ते दुरुस्त करावेत.
* मुख्य चौकातील दक्षिण बाजूचे गटार बांधावे.
* पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळावे


0 Comments