google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील ७१ हजार कार्डधारकांना मोफत डिजिटल ई-शिधापत्रिका संजय खडतरे; सांगोला तालुक्यातील नागरिकांचा वेळ वाचणार, पैशाची बचत होणार

Breaking News

सांगोला तालुक्यातील ७१ हजार कार्डधारकांना मोफत डिजिटल ई-शिधापत्रिका संजय खडतरे; सांगोला तालुक्यातील नागरिकांचा वेळ वाचणार, पैशाची बचत होणार

सांगोला तालुक्यातील ७१ हजार कार्डधारकांना मोफत डिजिटल ई-शिधापत्रिका संजय खडतरे;


सांगोला तालुक्यातील नागरिकांचा वेळ वाचणार, पैशाची बचत होणार

सांगोला : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

रेशन कार्ड काढण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. यामध्ये त्यांची पिळवणूक होत होती. यासह आर्थिक बाजूनेदेखील त्यांना झळ बसत होती. 

या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन कोणत्याही प्रकारचे शुल्क न येता कार्डधारकांना आता डिजिटल ई- शिधापत्रिका मिळणार आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील एकूण ७१ हजार १३५ कार्डधारकांना मोफत डिजिटल ई शिधापत्रिका मिळणार आहे, अशी माहिती तहसीलदार संजय खडतरे यांनी दिली आहे.

सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन सेवेव्दारे ई-शिधापत्रिका सुविधा आता निःशुल्क उपलब्धसादर

करून देण्यात आली आहे. अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन

 शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जदारास संकेतस्थळावरून ई-शिभापत्रिका डाऊनलोड करता येईल. 

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभाथ्र्यांसाठी क्यूआर कोड आधारित ई-शिक्षापत्रिका ऑनलाईन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 त्या शिधापत्रिकेवर योजनेबाबत अंत्योदय अन शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब योजना व राज्य योजनेंतर्गत राष्ट्रीय अनसुरक्षा योजनेंतर्गत असे नमूद करण्यात येणार आहे.

 सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत ऑनलाईन सेवेव्दारे ई- शिधापत्रिका सुविधेकरिता सेवानिहाय शुल्क निश्चित करण्यात आले आहे. 

अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर ई-शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल.

अंत्योदय अन्न योजना २५ रुपये, प्राधान्य कुटुंब योजना ५० रुपये, एपीएल शेतकरी ५० रुपये, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेव्यतिरिक्त व एपीएल शेतकरी व्यतिरिक्त ५० रुपये व शुभ्र शिधापत्रिका १०० रुपये असे

 दर यापूर्वी निश्चित करण्यात आले होते; मात्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व राज्य योजनेचे शिधापत्रिकाधारक है गरीब व गरजू कुटुंबातील आहेत.

 त्यामुळे योजनांच्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत ऑनलाईन ई- याशिधापत्रिका सुविधेसाठी सेवा शुल्क न आकारता मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे.

 या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे तसेच पैशाची बचत होणार आहे, असे तहसीलदार संजय खडतरे यांनी सांगितले आहे.

रेशनकार्डवरील नाव कमी करणे वाढविणे, नावातील बदल, कार्ड इतर दुकानाला जोडणे यासह रेशनकार्डमधील बदलांकरिता नागरिकांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करावे लागणार आहेत. 

या ई-शिधापत्रिका ऑनलाईन प्रक्रियेमुळे नागरिकांचा वेळ वाचून त्यांची आर्थिक बचतदेखील होणार आहे.

- किशोर बिडवे तहसीलवर सांगोला

Post a Comment

0 Comments