मोठी बातमी.... डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विविध
मागण्यासाठी मा.तहसिलदार साहेब सांगोला यांना निवेदन देण्यात आले
सांगोला ( प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब देशमुख व इतर मांन्यवरानी निवेदनाद्वारे केलेल्या प्रमुख मागण्या सांगोला तालुक्यातील मुक्या जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे तसेच सांगोला तालुक्यातील शेतीसाठी व पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करुन द्यावे.दुधाचे दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावेत.
सध्या महाराष्ट्रात मान्सुन उशीरा झालेमुळे पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवारात असलेली उभी पिके जळुन जाऊ लागली आहेत.
तरी सर्व सिंचन योजनेद्वारे शेतीसाठी पाणी तसेच टँकरद्वारे वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न झाला असून जनावरांसाठी चारा उपलब्ध करणेत यावा.
तसेच महाराष्ट्र सरकारने दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. व वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, या सर्व मागणीसाठी डॉ. बाबासाहेब देशमुख व इतर मांन्यवरानी सांगोला तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले आहे.


0 Comments