google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज” २०२३ पुरस्कार जाहीर

Breaking News

प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज” २०२३ पुरस्कार जाहीर

 प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना 


“राष्ट्रीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज” २०२३ पुरस्कार  जाहीर
    

शिरभावी  :-      सांगोला तालुक्यातील शिरभावी गावचे युवक सुपुत्र व श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक  प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज” २०२३ पुरस्कार नुकताच जाहीर  झाला आहे .

 ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा “राष्ट्रीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज” २०२३ पुरस्कार प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे .  

शैक्षणिक,सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठित समजला जाणारा “राष्ट्रीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज” २०२३ पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती ॲड. प्रिती कोळी व डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या कडून  पत्राद्वारे देण्यात आली आहे.

 ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यांच्याकडुन बेडकिहाळ या ठिकाणी ३ रे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 

या संमेलनात समाजाच्या सर्वांगीण विकासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तिंना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरविले जाते. 

 या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या “राष्ट्रीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज” २०२३ पुरस्कारासाठी  प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. 

या पुरस्कारासाठी फक्त ११ व्यक्तींची निवड केली जाते. या ११ व्यक्तींमध्ये प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची निवड झाली आली आहे ही खरोखरच खूप अभिमानाची गोष्ट आहे .

       प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची शैक्षणिक,सामाजिक व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून  त्यांची या पुरस्कारासाठी निवड  केली आहे .  या पुरस्काराचे स्वरूप  सन्मानचिन्ह,  

गौरवपत्र,  मेडल, कोल्हापुरी फेटा, श्रीफळ असे आहे.  सदर पुरस्कार वितरण सोहळा  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  वार रविवार दिनांक  16 जुलै 2023. रोजी दुपारी 1.00 वा. देशभक्त

 रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह बी. एस. संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, बेडकिहाळ सर्कल जवळ,

 बेडकिहाळ या ठिकाणी पार पडणार आहे . अशी माहिती ॲड. प्रिती कोळी व डॉ. विक्रम शिंगाडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

              प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे  यांना आई ताई घोरपडे , वडील दत्तात्रय घोरपडे , भाऊ नवनाथ घोरपडे , बहीण रेश्मा दिघे व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक वाघमारे सर, गायकवाड सर, देशपांडे सर, सी . बी . रोंगे सर, आप्पा रोंगे सर, 

एन . डी . बंडगर सर, आनंदा आलदर सर, भारत पाटील सर, कुलकर्णी सर, पवार सर, राकेश पवार, इनामदार सर,

 लट्ठे सर, दिघे मॅडम, कुरणे मॅडम, गाडे मॅडम, चव्हाण मॅडम, पाटोळे मॅडम, सय्यद मॅडम, मोरे मॅडम, पोरे मॅडम, 

गेजगे मॅडम, ढोले मॅडम व चुलते धनंजय घोरपडे सर, संतोष घोरपडे सर, विष्णु घोरपडे, रामचंद्र घोरपडे, 

नामदेव घोरपडे, सिताराम घोरपडे तसेच काकू प्रा. विद्या घोरपडे , प्रियांका घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

तसेच  संतोष मोरे, सिद्धेश्वर मोरे, यांचा ही प्रत्येक कार्यात त्यांना नेहमी पाठिंबा राहिला आहे. प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांनी हा पुरस्कार 

म्हणजे खऱ्या अर्थाने या सर्वांचा गौरव आहे . व या सर्व कार्यामध्ये वरील सर्वांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments