google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक पदी नियुक्ती

Breaking News

प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक पदी नियुक्ती

 प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक पदी नियुक्ती  


शिरभावी  :-      सांगोला तालुक्यातील शिरभावी गावचे  सुपुत्र व श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक  


प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशान्वये भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या ( सेल )  सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

पदवीधर प्रकोष्ठ (सेल) भाजपा महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रातील  कार्य व योगदान ध्यानात घेऊन श्री. धनराज देविदास विसपुते ( प्रदेश संयोजक, पदवीधर प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र निमंत्रित सदस्य,

 प्रदेश कार्यकारणी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र, चेअरमन, आदर्श शैक्षणिक समूह, पनवेल ) यांच्या सहीचे  त्यांच्या कार्यालयाकडून प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. 

      भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या माध्यमातून पदवीधरांच्या विविध समस्या समजून घेवून, त्या सोडविण्यासाठी व पदवीधरांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत . 

तसेच पदवीधरांची सदस्य नोंदणी अभियान भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या माध्यमातून राबविले जाणार आहे . भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या माध्यमातून पदवीधरांच्या वेगवेगळ्या समस्या जाणून घेऊन त्यावरती उपाय योजना केल्या जाणार आहेत असा या प्रकोष्ठचा उद्देश आहे . 

यासाठी  प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशान्वये भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या ( सेल )  सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .

Post a Comment

0 Comments