google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला न.पा.मालमत्ता क्र.९९४ या वाणी समाजाच्या नावे असणाऱ्या जागेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे !

Breaking News

सांगोला न.पा.मालमत्ता क्र.९९४ या वाणी समाजाच्या नावे असणाऱ्या जागेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे !

 सांगोला न.पा.मालमत्ता क्र.९९४ या वाणी समाजाच्या नावे


असणाऱ्या जागेत जगतज्योती

महात्मा बसवेश्वर महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे !

सांगोला विशेष प्रतिनिधी ; सांगोला नगर परिषद मालमत्ता क्रमांक ९९२/९९३ या जागेत वाणी लोकांचे (महादेव मंदिर) देवालय असून या मंदिराच्या जागेला सिटी सर्वे नंबर २०८३ व २०८४ हा नंबर देण्यात आला आहे. 

या ठिकाणी असणारे महादेव मंदिर हे हेमाडपंथी असून या मंदिराची देखभाल दुरुस्ती अभावी पुरती दुरावस्था झाली असून या मंदिरात जाण्यासाठी रस्ता देखील ठेवण्यात आला नाही.

मंदिराच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. शेकडो वर्षांपूर्वीच्या या महादेव मंदिरच्या मालमत्ता क्रमांक ९९२/९९३ वर शेकडो वर्षापासून वाणी लोकांचे देवालय अशी नोंद असतानाही 

 सांगोला नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष,नगरसेवक बांधकाम सभापती, आरोग्य सभापती, पाणीपुरवठा सभापती, सुकाणू समिती वर वाणी समाजातील सदस्यांनी पदे भूषवली आहेत.परंतु या  समाजातील एकाही लोकप्रतिधींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला नाही. 

किंवा या मंदिराच्या परिसरात केलेले अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे वाणी लोकांचे देवालय म्हणून नगरपरिषद कार्यालयात शेकडो वर्षांपासून नोंद असणाऱ्या महादेव मंदिराचा वाणी समाजाला विसर पडला आहे.

या शिवाय सांगोला नगरपरिषद मालमत्ता क्रमांक ९९४ वाणी लोकांचे थडग्याचे मैदान अशी शेकडो वर्षापासून नोंद आढळते आजही मालमत्ता क्रमांक ९९४ हा वाणी लोकांचे थडग्याचे मैदान म्हणूनच या जागेचा उतारा न.पा. कार्यालयातून मिळत आहे.

 परंतु मालमत्ता क्रमांक ९९४ या  जागेचा सिटीसर्वे झालेला नाही. सांगोला शहराचा सन १९८० साली  सिटी सर्वे झाला त्यावेळेस सदर जागा ही खुली असल्याकारणाने सदर जागेस सिटी सर्वे नंबर देण्यात आला नाही.

त्यामुळे आजही सदरची जागा खुली असल्याचे पहावयास मिळत आहे. वाणी लोकांसाठी आरक्षित असलेल्या या खुल्या जागेची तातडीने मोजणी करून या जागेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे.

वाणी समाजातील प्रमुख लोकप्रतिनिधी व जेष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन वाणी  समाज्याच्या नावे असणाऱ्या या जागेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी समिती गठीत करावी आणि या मागणी चा पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments