सांगोला ता. महुद महीम रस्त्यावरील हनुमान मंदिरानजीक वाहनाच्या धडकेत पती-पत्नी ठार
दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीस अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दोघे जण जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास महुद महीम रस्त्यावरील हनुमान मंदिरानजीक घडला.
ज्ञानेश्वर तुकाराम पाटील (वय ४५), ताई ज्ञानेश्वर पाटील (वय ३८, रा. सोनके, ता. पंढरपूर) अशी अपघातामध्ये ठार झालेल्या पती पत्नीची नावे आहेत..
शुक्रवारी सायंकाळी ज्ञानेश्वर पाटील व ताई पाटील हे दुचाकी क्रमांक एमएच १३ - बीएम ९६७५ वरून महीम(ता. सांगोला) येथील नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
तेथून कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून महीमकडून सोनके गावाकडे जात असताना महुदकडून महीमकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हनुमान मंदिरानजीक समोरून जोराची धडक दिली.
या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस नाईक राजू चौगुले, विकास क्षीरसागर, पोलिस पाटील प्रभाकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते बंटी लवटे यांनी अपघातस्थळी भेट देऊन मदत केली.


0 Comments