ब्रेकिंग न्यूज.. सांगोल्यातील बहुतांश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये पार्किंगच नाही
; न.पा.मधील अधिकाऱ्यांना मलिदा देवून NOC घेतल्याच्या चर्चांना उधान
सांगोला विषेश प्रतिनिधी सांगोला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून बहुतांश डॉक्टरांनी शहरात अनेक आपल्या हॉस्पिटलमध्ये शासनमान्य MJPJAY हि योजना सुरू केली आहे.
या MJPJAY मधून मोफत होणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी तालुक्यातील तसेच
आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्ण मोठ्या संख्येने सांगोला शहरात असणाऱ्या या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेण्यासाठी येत असतात.
सांगोला शहरातील अनेक भागात असणाऱ्या कोणत्याही मल्टीस्पेशालिटी • हॉस्पिटलमध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे
नातेवाईक आपापली वहाने भर रस्त्यावर व इतर व्यावसायिकांच्या दुकान समोर लावून वहातुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता सांगोला शहरात असणाऱ्या काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारती ह्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्याचे दिसून येते तर काही इमारती स्वतःच्या मालकीच्या आहेत.
स्वतःच्या किंवा भाडेतत्वावर घेतलेल्या एकाही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये रुग्ण घेवून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही.
तरीही सांगोला नगर परिषदेचे तात्कालीन मुख्याधिकारी यांनी मलिदा घेवुन या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सांगोला शहरात असणान्या बहुतांशी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध नसताना
नगरपरिषद कार्यालयाकडून देण्यात आलेल्या (NOC) प्रमाणपत्राची नगरपरिषदेचे नवनियुक्त कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब यांनी तातडीने चौकशी करून संबंधित
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालकांना दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करून त्यांना तातडीने पार्किंग बाबत नोटीस बजावून खुलासा मागणी करण्यात यावा.
आणि जे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालक पार्किंगची सुविधा करणार नाहीत. त्यांचा हॉस्पिटलचा परवाना कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सुधीर गवळे साहेब यांनी तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.


0 Comments