google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, शहराला ७ तर ग्रामीणला ६ नवे पोलीस निरीक्षक

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, शहराला ७ तर ग्रामीणला ६ नवे पोलीस निरीक्षक

 सोलापूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,


शहराला ७ तर ग्रामीणला ६ नवे पोलीस निरीक्षक

राज्याच्या गृह मंत्रालयाने तब्बल ४४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर शहराला ७ तर सोलापूर ग्रामीणला ६ नवे पोलीस निरीक्षक मिळणार आहेत.

यामध्ये शहरातील पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे व कमलाकर पाटील यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस दलात झाली आहे.

बदली झालेल्यांमध्ये बजरंग साळुंखे सोलापूर शहर ते सोलापूर ग्रामीण, कमलाकर पाटील सोलापूर शहर ते सोलापूर ग्रामीण, राजेश नंदीमठ सोलापूर ग्रामीण ते मुंबई शहर,

दीपक पाटील पोलीस प्रशिक्षण केंद्र ते सोलापूर ग्रामीण, दत्तात्रेय वाघचौरे पुणे ते सोलापूर शहर, धनंजय जाधव सोलापूर ग्रामीण ते सोलापूर शहर, रामदास शेळके सोलापूर ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक

विभाग, शिरीष हुंबे जालना ते सोलापूर ग्रामीण, महादेव राऊत बीड ते सोलापूर शहर, अरुण पवार सोलापूर ग्रामीण ते लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रकांत माने सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र ते सोलापूर शहर, सुरेश वसेकर पोलीस प्रशिक्षण केंद्र,

नानवेज ते सोलापूर शहर, सुरेश वसा गुन्हे अन्वेषण विभाग ते सोलापूर शहर, रामदास चोपडे पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते ठाणे, हर्षवर्धन बारवे पोलीस प्रशिक्षण केंद्र ते महामार्ग पोलीस, सिद्धेश्वर जंगम पोलीस प्रशिक्षण केंद्र ते सांगली, वैष्णवी पाटील पोलीस प्रशिक्षण केंद्र ते सोलापूर शहर,

उमाकांत शिंदे राज्य गुप्त वार्ता ते सोलापूर शहर, विकास दिंडोरे जात पडताळणी कार्यालय ते सोलापूर ग्रामीण, स्मिता सुतार पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते रत्नागिरी अशा बदल्या झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments