google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात शरदचंद्रजी पवार ग्रंथमित्र पुरस्कार २०२३ उदनवाडी वाचनालयाला प्रदान.

Breaking News

सांगोला तालुक्यात शरदचंद्रजी पवार ग्रंथमित्र पुरस्कार २०२३ उदनवाडी वाचनालयाला प्रदान.

सांगोला तालुक्यात शरदचंद्रजी पवार ग्रंथमित्र पुरस्कार २०२३ उदनवाडी  वाचनालयाला प्रदान.


सांगोला प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) –

उदनवाडी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाला शरदचंद्रजी पवार ग्रंथमित्र पुरस्कार २०२३ हा पुरस्कार देशाचे नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांचे हस्ते शुक्रवार दि १६ जून रोजी अमळनेर (जि. जळगाव)

 येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याचे  विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे आम. नाथाभाऊ खडसे,राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक सौ. रिताताई बाविस्कर, शरदचंद्रजी पवार ग्रंथमित्र निवड समितीचे प्रमुख प्रशांत लोंढे यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुरस्कार स्विकारण्यासाठी ग्रंथालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वलेकर, संस्थेच्या खजिनदार सौ. चिंगुताई वलेकर, ग्रंथपाल विजय वलेकर, सांगोला तालुका बाजार कमिटीचे संचालक 

आबासो आलदर, युवा नेते प्रशांतभाऊ वलेकर, तानाजी वलेकर, युवा उद्योजक अमोल वलेकर, सुर्याजी पाटील, विजय गेजगे इ. मान्यवरांनी हा पुरस्कार स्विकारला.

             उदनवाडी वाचनालयाला पुरस्कार मिळताच समाजातील सर्व स्तरातून ग्रंथालय चालक, कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु असुन वाचकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments