google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री विठ्ठल मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचा सांगोला येथे भव्य लोकार्पण सोहळा

Breaking News

श्री विठ्ठल मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचा सांगोला येथे भव्य लोकार्पण सोहळा

 श्री विठ्ठल मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचा  सांगोला येथे भव्य लोकार्पण


सोहळा सांगोल्याच्या सहकार आणि अर्थकारणाला मिळणार नवी चालना

सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोलाचा रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी सकाळी अकरा वाजता पार्वती निवास रेल्वे स्टेशन समोर मेन रोड 

सांगोला (जुनी युनियन बँक ऑफ इंडिया) या ठिकाणी भव्य लोकार्पण सोहळा आयोजित केला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन दीपक दत्तात्रय बंदरे यांनी दिली आहे.सांगोला शहर आणि तालुक्यातील सहकार आणि अर्थकारण क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणाऱ्या 

श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोल्याच्या या भव्य लोकार्पण सोहळ्यास सांगोल्याचे पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक भाऊसाहेब रुपनर, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. पी सी झपके सूर्योदय परिवाराचे सर्वेसर्वा आणि एल. के. पी. मल्टीस्टेट को-ऑपरेटिव बँकेचे

 चेअरमन अनिल भाऊ इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच आजी माजी नगरसेवक, पत्रकार, डॉक्टर, वकील, आणि शहरातील नामवंत व्यापारी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments