सांगोल्यातील महा ई सेवा केंद्रांवर पालक विद्यार्थ्यांची
मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट कागदी घोडे नाचवून अधिकारी " नामानिराळे
सांगोला प्रतिनिधी: दहावी बारावीचा निकाल लागल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे.
शासकीय सेतू बंद असल्याने या पालक, विद्यार्थ्यांना महा ई सेवा केंद्रावरून दाखले काढून घ्यावे लागत आहेत. शासकीय सेतू केंद्र बंद असल्यामुळे मोठ्या अडचणीचा समाना पालक आणि विद्यार्थ्यांची करावा लागत आहे.
जिल्हाप्रशासनाकडून सेतूची निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निविदा काढण्याबाबत कोणत्याच हालचाली जिल्हाप्रशसनामध्ये दिसत नाहीत. यांचा फायदा महा-ई-सेवा केंद्रवाले घेत आहेत.
जादा दरांची अकारणी करत पालक आणि विद्याथ्र्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुका पातळीवरील सेतू कार्यालये बंद केली आहेत.
त्यामुळे विविध दाखले मिळविण्या साठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, नॉनक्रिमिलेअर, प्रतिज्ञापत्रे, साठी आता चक्क दोनशे तीनशे रूपये मोजावे लागत आहेत.
ग्रामिण भागात तर मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे. दाखला तात्काळ पाहिजे असल्यास त्यांचा दर वेगळा आहे. सेतू कार्यालय नव्याने चालू करण्यासंदर्भात प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे.
लवकरच निविदा काढून सेतू कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.मात्र आद्याप निविदेचा पत्ता नाही प्रशासकाडून सेतूची निविदा काढण्याबाबत कोणत्याही चालचाली दिसत नाहीत.
यांचा फायदा महा-ई- सेवा केंद्र चालक घेत आहेत. सेतू कार्यालयात दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर तीन दिवसांमध्ये दाखले मिळत होते. मात्र महा-ई- सेवा केंद्र मध्ये अर्ज दाखल केल्या नंतर दाखला मिळवण्यासाठी तब्बल १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत आहे.
यामुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेसाठी मोठ्या अडचणी येत असल्याच्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. परंतु या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कोणताही अधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही.
आषाढीवारीचे कारण देवून कागदी घोडे नाचवून अधिकारी नामानिराळे झाले आहेत. सोलापूरजिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रे बंद करण्यात आल्या पासून महा-ई-सेवा केंद्रामध्ये होणारी आर्थिक लूट लक्षात घेता कोणत्याही
महा-ई-सेवा केंद्राची पथक नेमुन तपासणी करण्यात आली नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्र चालक राजरोसपणे दिवसाढवळ्या पालक, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट करत आहेत.
या लुटीच्या बातम्या अनेक वृत्तपत्रात झळकत आहेत. तरीही या बातम्यांची कोणत्याही प्रकारची दखल जिल्हाधिकारी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे सांगोला तालुक्यातील पालक विद्यार्थ्यांची हवालदिल झाले आहेत.
0 Comments