google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केंद्र सरकारच्या योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोचवा - चेतनसिंह केदार - सावंत सांगोल्यात भाजपच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न

Breaking News

केंद्र सरकारच्या योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोचवा - चेतनसिंह केदार - सावंत सांगोल्यात भाजपच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न

सांगोल्यात भाजपच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न..


केंद्र सरकारच्या योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोचवा - चेतनसिंह केदार - सावंत

सांगोला (तालुका प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क): 

गेल्या नऊ वर्षांत देशातील विकासाचे चित्र पार बदलून गेले आहे. पतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजातील

 प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोचविणाऱ्या योजना दिल्यात त्याची प्रभावी अंमलबजावणीही केली. प्रत्येक घरात केंद्र सरकारच्या योजनेचा लाभार्थी आहे.

 ही कामे, योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोचवा असा मंत्र भाजपचे 

सांगोला विधानसभा निवडणूक प्रमुख तथा सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत पांनी आपल्या सोशल मीडिया सेलच्या पदाधिकान्यांना दिला. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली. 

या पार्श्वभूमीवर देशभरात मोदी9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भाजपची सोशल मीडिया हाताळणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत झाली.

या बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सांगोला विधानसभा निवडणूक प्रमुख तथा सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, की २०१४ मध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणारा एकमेव पक्ष भाजप होता. 

त्या आधारे आपण आपले विचार, अजेंडा व मोदीचे इंन्डिंग करू शकलो. आता सर्वच विरोधी पक्ष सोशल मीडियाचा वापर आपल्यापेक्षाही अधिक अधिक परिणामकारक पद्धतीने करीत आहेत. 

त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. मोदी सरकारच्या योजना, कामे सर्व घटकांपर्यंत पोचविण्याचे काम सोशल मीडियाद्वारे

 करण्याचे आवाहनत्यांनी केले. तालुक्यातील घराघरापर्यंत आपली कामे, विचार पोचवायचे आहेत, असे ते म्हणाले.

या बैठकीला डॉ. विजय बाबर, प्रवीण जानकर, संजय गव्हाणे, मानस कमलापुरकर, प्रसाद फुले सूर्यकांत इंगोले, ओंकार कुलकर्णी, अमोल लिगाडे, विकास सावंत, अनिल वाघमोडे, विशाल कुलकर्णी, सिध्देश्वर गाडे, कृष्णा कांबळे, 

सुरेश बुरांडे पप्पू पाटील, सोपजित केदार, बाळासो चहाण, किरण केदार विनोद उबाले प्रथमेश आमणे, यांच्यासह भाजपच्या सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments