google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे राहुलचे करू द्या

Breaking News

माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे राहुलचे करू द्या

संतप्त प्रतिक्रिया  माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे राहुलचे करू द्या


महाराष्ट्रात गाजत असलेल्या दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. राहुलला पुण्यात आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. राहुलला अटक करण्यात आल्याची माहिती समजताच दर्शनाच्या आईने आणि भावाने आक्रमक भूमिका घेत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

राहुलने माझ्या बहिणीचा घात केला आहे, आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाही तर त्याला मारून टाका, अशी 

संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या भावाने दिली आहे. तसेच सोशल मीडियावरही आरोपी राहुलवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

आरोपी राहुलने जसे माझ्या दर्शनाचे तुकडे केले, तसे मला राहुलचे तुकडे करायचे आहे, 

माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, असे म्हणत दर्शनाच्या आईने तिचा संताप व्यक्त केला आहे. दर्शना आणि राहुल हे राजगडावर फिरण्यासाठी गेले होते. 

परंतु गडावरून फक्त राहुल बाहेर पडला होता. काही दिवसांनंतर दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. 

राहुल फरार झालेला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 

त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राहुलने दर्शनाची राजगडावर हत्या करत पळ काढला होता.द्या

महाराष्ट्रात गाजत असलेल्या दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. राहुलला पुण्यात आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 राहुलला अटक करण्यात आल्याची माहिती समजताच दर्शनाच्या आईने आणि भावाने आक्रमक भूमिका घेत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राहुलने माझ्या बहिणीचा घात केला आहे, आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाही तर त्याला मारून टाका, 

अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या भावाने दिली आहे. तसेच सोशल मीडियावरही आरोपी राहुलवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपी राहुलने जसे माझ्या दर्शनाचे तुकडे केले, 

तसे मला राहुलचे तुकडे करायचे आहे, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, असे म्हणत दर्शनाच्या आईने तिचा संताप व्यक्त केला आहे. दर्शना आणि राहुल हे राजगडावर फिरण्यासाठी गेले होते. परंतु गडावरून फक्त राहुल बाहेर पडला होता. 

काही दिवसांनंतर दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. राहुल फरार झालेला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राहुलने दर्शनाची राजगडावर हत्या करत पळ काढला होता.

Post a Comment

0 Comments