दुधाला हमीभाव मिळालाच पाहिजे; दुध दरासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात 'शेकाप' रस्त्यावर आक्रमक
'दुधाचे दर पाडणाऱ्या सरकारचे करायचे काय, खाली
मुंडी वर पाय' अशा घोषणा देत आज रस्त्यावर उतरत दूध दरासाठी आंदोलन केले.
सांगोला : दुधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट झाली असतानाही दूध डेअरीकडून दुधाच्या दरामध्ये ५ ते ६ रुपयांनी घट झाली आहे. दुसरीकडे पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर वाढत चालले आहेत.
त्यामुळे दुध उत्पादनाचा खर्च वाढत असून उत्पन्नात घट झाल्याने दुध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
त्यामुळे सरकारच्या धोरणाच्या विरोधात बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.
'दुधाचे दर पाडणाऱ्या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय' अशा घोषणा देत आज रस्त्यावर उतरत दूध दरासाठी आंदोलन केले.
यावेळी पंचायत समिती चौकात रास्ता रोको करण्यात आला. दुध दरामध्ये वाढ करावी, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतला.
बाबासाहेब देशमुख यांनी शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या दुध दराबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेवून त्वरित हा विषय मार्गी लावावा अशी मागणी केली. यावेळी सांगोल्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाकडून दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर १०-१५रुपये अनुदान जमा झालेच पाहिजे आणि
अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला अनुदान मिळाले पाहिजे अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले. निसर्गाच्या अवकृपा व सरकारची अपुरी मदत यामुळे
शेतकरी पुर्णपणे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी दुध व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केले पण अचानक राज्यसरकाच्या चुकीच्या धोरणामुळे
दुधाचे दर कमी झाल्याने राज्यसरकारने दुधाचे दर वाढवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी व दुध दरवाढ करावी. असे मत आंदोलनाला उपस्थित शेतकऱ्यांनी मांडले.




0 Comments