google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी योगा हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय:- सुवर्णा इंगवले मॅडम

Breaking News

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी योगा हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय:- सुवर्णा इंगवले मॅडम

 वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. शारीरिक आणि मानसिक


त्रासांपासून दूर राहण्यासाठी  योगा हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय:- सुवर्णा इंगवले मॅडम

सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी दशेत, शैक्षणिक, सामाजिक  क्षेत्रात काम करताना 

प्रचंड धावपळ होत असते, यामुळे मनावर ताणताणाव येत असतो. म्हणूनच मन आणि शरीर दोन्हीही सशक्त, तंदुरुस्त,

 शांत, संयमी ठेवायचे असेल तर योगा आणि प्राणायाम अत्यंत महत्त्वाचे आहे. ते सर्वांनी नित्य नियमाने करावे. 

असे प्रतिपादन सुवर्णा इंगवले मॅडम यांनी योग दिनानिमित्त केले. सांगोल्यातील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जागतिक योग दिनानिमित्त योगशिक्षिका इंगवले मॅडम यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली त्यामध्ये भ्राह्मरी, 

भुजंगासन, भसीक्रा, अनुलोम- विलोम त्यास विद्यार्थ्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments