सांगोला हद्दीतील हात गाडी टपरी भाजीपाला विक्रेते यांच्या प्रश्नाबाबत
शहरातील बंद असलेली,रस्त्यास अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढणार- मुख्याधिकारी सुधीर गवळी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) सांगोला नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्याशी सविस्तर चर्चा करून सर्वानुमते सर्वांनी आपले व्यवसाय आहे त्या ठिकाणी मागे सारून रहदारीस अडथळा येणार नाही
आणि इतरांना आपला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन आपला व्यवस्थित व्यवसाय करावा असे तसेच साफसफाई स्वच्छता याचीही काळजी घ्यावी अशी सूचना
तसेच नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी ठरवून जागा देणार आहेत लाईन मारून आणि त्याप्रमाणे आपला व्यवसाय व्यवस्थित करावा असे संघटनेच्या वतीने सर्वांना कळविण्यात येत आहे.
सर्व कामासाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व राजकीय पक्ष नेते मंडळी पत्रकार आणि आपले व्यवसाय बंधू यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार
आणि येथून पुढे ज्या ज्या वेळेला काही आपल्या वैयक्तिक अडचणी निर्माण होतील त्यावेळेला संघटनेची संगणमत करूनच पुढील कारवाई करावी अशी संघटनेच्या वतीने कळविण्यात येत आहे..
0 Comments