google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान... उकाड्याने घराबाहेर झोपले, चोरट्यांनी घरात प्रवेश करून केली ५५ हजार रुपये रक्कम व ५ मोबाईलची चोरी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

Breaking News

सावधान... उकाड्याने घराबाहेर झोपले, चोरट्यांनी घरात प्रवेश करून केली ५५ हजार रुपये रक्कम व ५ मोबाईलची चोरी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

सावधान... उकाड्याने घराबाहेर झोपले, चोरट्यांनी घरात प्रवेश करून केली


५५ हजार रुपये रक्कम व ५ मोबाईलची चोरी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

मंगळवेढा तालुक्यातील डिकसळ येथे घराच्या दरवाज्याला कडी लावून दारासमोर कट्टयावर झोपल्याची संधी साधून घरात प्रवेश करून

अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रोख रक्कम व १० हजार रुपये किमतीचे मोबाइल असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना  रात्री १०. ३० ते पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी सत्यवान सोपान पाटील व त्यांच्या कुटुंबातील सदस्य दि.१५ मे रोजी रात्री १०.३० च्या सुमारास जेवण करून उन्हाळयाचे दिवस असल्याने घराला बाहेरून कडी लावून घराच्या बाहेर कट्यावर झोपले झोपताना,फिर्यादी कडील रेडमी कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल व सॅमसंग कंपनीचा अंड्राइड मोबाईल हे उशाला ठेवले होते.

पहाटे २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या चुलत्याची मुलगी साक्षी पाटील हीस अचानक जाग आली असता घराचा दरवाजा उघडा दिसला.तिने घराचा दरवाजा लावण्यासाठी दरवाजाजवळ गेली असता तिला घरातील कपडे तसेच तिजोरीतील सामान व कपडे आस्थाव्यस्त पडलेले दिसले.

तिने फिर्यादीचा चुलता मनोहर पाटील यांना उठवले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता तिजोरीतील सामान व कपड़े आस्थाव्यस्त पडलेले दिसले व तिजोरीत ठेवलेले ५ हजार रुपये तिजोरीमध्ये मिळून आलेले नाहीत. त्यांनी त्याचे चार्जिंग लावलेले दोन मोबाईल घरात नव्हते.

आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी व भाऊ रामेश्वर पाटील यांना उठविले. तसेच भाऊ रामेश्वर पाटील यांच्या घराचा दरवाजा उडा दिसला, त्यामुळे त्याचे घरात जाऊन पाहिले असता घरात ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाईल व तिजोरीमध्ये ठेवलेले ५० हजार रुपये मिळून आले नाहीत म्हणून चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर,

अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रोख रक्कम व १० हजार रुपये किमतीचे मोबाइल असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोना सचिन बनकर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments