ब्रेकिंग! सोलापूर हादरले : तीन लाख रुपयांच्या लालसेपोटी...
सोलापूर : अठरा दिवसांच्या नवजात बाळाला तीन लाखाला विकल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. यात बाळाला विकल्याप्रकरणी आई-वडिलांसह, त्या बाळाला विकण्यासाठी मदत केलेल्या
सर्व १० जणांवर सदर बाझार पोलिस ठाण्यात अल्पवयीन न्याय कायदाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे. ३० एप्रिल रोजी पूजा यांनी एका मुलाला जन्म दिला. त्या बाळ आजारी असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत होते.
त्यावेळी पूजा यांच्या ओळखीतील आरोपी संगीता बगले ही पूजा यांना म्हणाली, तुला अगोदरच तीन मुले आहेत. शिवाय तुझा नवरा दारुडा आहे. त्याला कसे संभाळणार. मी एका डॉक्टराला ओळखते. तो त्या मुलावर मोफतमध्ये उपचार करतील, असे सांगितले. त्यानंतर पूजा यांना संगीता बगले हिने मरीआई चौकात बोलवत बाळाची मागणी केली. त्यावेळी पूजा यांनी बाळाला दिले नाही.
त्यानंतर ९ मे रोजी सकाळी पूजा यांना बाळासह जिल्हा परिषदेच्या दर्ग्याजवळ येण्यास सांगितले. त्यावेळी संगीता बगले व तिच्या इतर साथिदारांनी बाळ दत्तक देत असल्याचे बॉन्ड करून त्यावर सही घेतली; पण बाळ कोणाला देण्यात येत आहे याचा उल्लेख बॉन्डवर केला नाही, अशा आशयाची तक्रार पूजा यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा उलट तपास करताना पूजा यांनी ते बाळ आरोपींना तीन लाखाला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिवाय या व्यवहारासाठी आरोपी मंगल जाधव हिने ८० हजार रुपये काढून घेत पूजा यांना दाेन लाख २० हजार रुपये दिल्याचे निष्पन्न झाले.



0 Comments