सांगोला राजाराम ढोले यांचेकडून मातोश्री वृद्धाश्रमास वॉशिंग मशीन भेट
सांगोला/प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) ःआलेगाव येथील रहिवासी व सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले श्री. राजाराम रामचंद्र ढोले यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मातोश्री वृद्धाश्रमास वॉशिंग मशीन भेट दिली.
मातोश्री वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या महिलांना कपडे धुण्याची सोय व्हावी म्हणून श्री. राजाराम ढोले यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ही वॉशिंग मशीन भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी मंजुषा ढोले, मुलगा सौरभ ढोले, मनोज बुरंजे, आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, उपाध्यक्ष दीपक चोथे,
डॉ. मच्छिंद्र सोनलकर, ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांचेसह मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राहुल जाधव, सुवर्णा अशोक जाधव व महिला उपस्थित होत्या. यावेळी दीपक चोथे व राजाराम ढोले यांनी मनोगत व्यक्त करत वृद्धाश्रमाला आपले नेहमीच सहकार्य असेल असे सांगितले.
0 Comments