google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर धक्कादायक घटना ! शिक्षकाने थंड डोक्याने पत्नीला संपवले

Breaking News

सोलापूर धक्कादायक घटना ! शिक्षकाने थंड डोक्याने पत्नीला संपवले

 सोलापूर धक्कादायक घटना ! शिक्षकाने थंड डोक्याने पत्नीला संपवले


सोलापूर (प्रतिनिधी) आर्थिक विवंचनेतून शिक्षक पत्नीचा निर्घृणपणे खून करुन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षक आरोपी विकास विश्वनाथ हरवाळकर (रा.नीता रेसिडेन्सी, जुळे सोलापूर)

 यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.एस.ए.ए.आर.औटी यांनी जन्मठेपेची शिक्षा व दहा लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. 

अर्चना विकास हरवाळकर (वय-३४) यांचा खून करण्यात आला होता. याबाबत प्रणय यशवंत कांबळे (रा.अदित्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ) यांनी फिर्याद दिली होती. 

फिर्यादीने घटनेदिवशी आपल्या मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहिला असता आत्याचा मुलगा असलेल्या आरोपीने फाशीच्या दोरीचे चित्र दाखवून बाजूस सॉरी, आपल्या विश्वासाला पात्र ठरलो नाही.एव्हरीथिंग इज लॉस्ट असा मजकूर टाइप केला होता. त्यामुळे फिर्यादीने आरोपीस फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर फिर्यादीने आरोपीचा मोठा भाऊ विलास यास फोन करुन ही बाब सांगितली. 

फिर्यादी हा त्याच्या लहान भावास घेवून आरोपीच्या घरी गेला. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. घराची बेल दाबली व दरवाजा ठोठावला. पण आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा लोखंडी दरवाजाची जाळी ओढून काढून आत प्रवेश केला. आरोपी विकास याच्या टी शर्टवर रक्ताचे डाग दिसून आले. 

तर त्याची पत्नी अर्चना ही खाली पडलेली दिसली. परिसर रक्ताने माखलेला दिसता, पोलीस व डॉक्टरांना बोलवले असता अर्चना ही मयत झाल्याचे सांगितले. तपासात विकासने पत्नीचा खून करुन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी विकास यास दोषी धरुन आरोपीला खुनाच्या अपराधाखाली जन्मठेपेची शिक्षा व दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. 

तसेच आरोपीच्या मुलास १० लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.यात सरकारतर्फे अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड.पुजारी यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस नाईक सुनंदा घाडगे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments