धक्कादायक ! तरुणाची चिट्टी लिहून आत्महत्या; मृत्यूस
कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीघांविरूध्द गुन्हे दाखल मंगळवेढ्यातील घटना...
मुलगा दारू पितो, जुगार खेळतो, काही कामधंदा करीत नाही असे नातेवाईकाकडे सांगून लग्न होवू देणार नाही अशी बदनामी करून
बालाजी गोपाळ कोकरे (वय 30) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रविंद्र पुजारी,सुभाष कोकरे,जमादार सुतार (रा.ब्रम्हपुरी) या तीघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी बापू गोपाळ कोकरे हे दि.25 रोजी शेतात काम करीत असताना
गावातील एका गृहस्थाने फोन करून संागितले तुझा भाऊ बालाजी याने तुमचे राहते घरी गळफास घेतलेला आहे. फिर्यादीने तात्काळ घरी जावून पाहिले असता मयत भाऊ बालाजीने पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
पोलिसांनी येवून मयत बालाजी याचे प्रेत खाली उतरवून घेवून सदर घटनास्थळाचा पंचनामा केला असता मयताच्या शर्टाच्या डाव्या खिशात चिठ्ठी मिळून आली त्याने मी व्यसन करीत नसताना रविंद्र पुजारी, सुभाष कोकरे, जमादार सुतार या व्यक्तींनी घरात काहीपण सांगून माझे जीवन संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
माइया मरणाला वरील तीघेजणच जबाबदार असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या त्रासामुळे मला जीवन जगणे असह्य करून टाकले आहे.या घटनेबाबत मृत्यूपुर्वी मयताने फिर्यादी भावास ही गोष्ट कानावर घातली होती. फिर्यादीने वरील तीघा आरोपींना माझे भावाची नातेवाईकात बदनामी करू नका, तो दारू पित नाही, जुगारही खेळत नाही,
तो तुमच्यामुळे त्याच्या जीवाला काहीतरी बरे वाईट करून घेईल असे फिर्यादीने त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्याने फिर्यादीस तुइया भावाचे लग्न होवू देणार नाही असे सांगून निघून गेले होते.
तेव्हापासून फिर्यादीचा भाऊ तीघांच्या त्रासामुळे मानसिक दबावाखाली होता.भाऊ मयत झाल्याने त्यांचे अंत्यविधी पूर्ण झाल्यावर फिर्याद दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसोा पिंगळे हे घटनेच्या मुळाशी जावून करीत असून त्यांनी चिठ्ठी लिहिलेली वही जप्त करून हस्ताक्षर नमुना घेन्यात आल्याचे तपास आधिकार्यांनी सांगीतले.


0 Comments