खळबळजनक... यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून परतताना ट्रकने कारला चिरडले सोलापूरातील सहा जणांचा मृत्यू
कर्नाटकातील होस्पेटजवळील दोट्टीहाळ गावाजवळ रविवारी ट्रक आणि कार यांच्यात धडक झाली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरूकडे पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले कारने निघाले होते.
त्यांच्यासोबत इंडी तालुक्यातील नंद्राळ गावचे दोन नातेवाईकही होते. या सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला.
राघवेंद्र सुभाष कांबळे (वय २५), जानू राघवेंद्र कांबळे (वय २३), राकेश राघवेंद्र कांबळे (वय ५) व रश्मिका राघवेंद्र कांबळे (वय २) सर्व जण राहणार लवंगी (ता.दक्षिण सोलापूर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तसेच नंद्राळ गावच्या त्यांच्या दोन नातेवाईकांचाही यात मृत्यू झाला आहे. लवंगी येथे यल्लम्मा देवीची यात्रा होती.
त्यानिमित्ताने कांबळे परिवार गावाकडे आले होते. कांबळे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह बंगळुरुकडे जात होते. यावेळी त्यांनी इंडी तालुक्यातील नंद्राळ गावच्या दोघा नातेवाईकांनाही सोबत घेतले. परंतु दोट्टीहाळ येथे भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यामध्ये ट्रकच्या खाली कार अडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.



0 Comments