सोलापूर जिल्ह्यातील नदीच्या पात्रातील वाळूचे अवैध उत्खनन
व वाहतुक झाल्यास संबंधित अधिकारी त्यास जबाबदार : - अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,
सोलापूर ; राज्यातील नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी तसेच अवैध वाळु उत्खनन वाहतुकीस प्रतिबंध करणेकामी शासनामार्फत वाळु उत्खनन व विक्री करण्याचे
सर्वणकोष धोरण प्रसिद्ध झाले आहे. तसेच याबाबत शासनस्तरावरून वाळूगट निश्चित करणे ,वानवाच परिमाण निश्चित करणे, वाळू डेपोसाठी ठिकाणे निश्चित करणे,
शासन स्तरावरुन पाठपुरावा होत आहे. त्यानुषाने प्रस्ताव सादर करणेच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, जिल्हयात नदीपात्रात पाणी असल्याने वाळूच सर्वेक्षण करता येत
नसलेबाबत संबंधित त्या त्या तालुक्यातील तहसीलदार यांनी दूरध्वनीद्वार तसेच लेखी स्वरुपात कळविले आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी असल्याने शासनाच्या धोरणाप्रमाणे कार्यवाही करता येत नाही.
सबब गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस प्रतिबंध करण्याकरिता करावयाच्या उपाययोजनासंबंधी शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत तसेच संबंधित अधिनियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
गौणखनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे यासाठी तहसील उपविभागीय स्तरावर स्वतंत्र भरारी दक्षता पथके निर्माण करणेचे निर्देश दिलेले आहेत.
तसेच सदर पथकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध उत्खनन व वाहतूकीस अटकाव करणे ही या पथकाची सामूहिक जबाबदारी आहे.
भरारी,दक्षता पथक मार्फत तपासणी नाके, वाळूघाटाच्या ठिकाणी आवश्यक अशा प्रकारच्या तपासणीकरिता कर्मचान्याची नियुक्ती करणेत यावी,
गौणखनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीची घटना या प्रकरण ज्या महसूल अधिकारी,
कर्मचारी यांच्या कार्यक्षेत्रात उघडकीस येईल ते अधिकारी कर्मचारी सदर प्रकारणास जबाबदार आहेत काय, याची कसून तपासणी करण्यात यावी तपासणीमध्ये संबंधित
स्थानिक अधिकारी व कर्मचारी अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आले किंवा त्यांनी अवैध उत्खनन वाहतुकीवर पुरेसे निवारन ठेवल्याचे आढळल्यास त्या संबंधितावर जबाबदारी
निश्चित करून त्यांच्याविरुध्द प्रचलित नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी यापुढे अवैध गौणखनिजाच्या वाहतूक व उत्खननाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास यास आपले पर्यवेक्षको शिथिलता आहे.
यास आपणास जबाबदार धरून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करवा याची गांभीर्याने नोंद घ्यावी.असे लेखी परिपत्रक अपर जिल्हाधिकारी सोलापूर तुषार ठोंबरे यांनी उप विभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना केले आहे.


0 Comments