सांगोला शहरातील छोट्या व्यवसायिकांच्या प्रश्नाबाबत मुख्याधिकारी करणार चर्चा
सांगोला/प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) – सांगोला शहरातील सर्व हात गाडी टपरी भाजीपाला फळ विक्रेते आधी सर्व छोट्या व्यवसायिकांनी
दिनांक 16 मे रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित केला होता या आंदोलनाला मोठ्या संख्येने छोटे व्यवसायिक उपस्थित होते.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाहेरगावी शासकीय कामानिमित्त गेल्याने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा होवू शकली नाही तेव्हा सायंकाळी सहा वाजता श्री कनेरे साहेब ओ एस यांनी मंडपात येऊन आंदोलन कर्त्याची चर्चा केली.
त्यांनी मुख्याधिकारी यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी तुमच्या शिष्ट मंडळाशी चर्चा करण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता वेळ दिलेला आहे तरी सकारात्मक चर्चेतून तुमचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही कनेरे साहेब यांनी दिल्याने आजचे आंदोलन थांबविण्यात आले.
दिनांक 17 मे बुधवार रोजी सकाळी 11 वाजता छोट्या व्यवसायिकांच्या शिष्ट मंडळासमवेत मुख्याधिकारी हे प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा करणार असल्याने सर्व छोट्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून
सकाळी दहा वाजता अंबिका मंदिर येथे उपस्थित रहावे अंबिका देवी मंदिर येथून सर्वांनी मिळून नगरपालिका कार्यालयासमोर एकत्र यावयाचे आहे
तरी आपला प्रश्न सोडवून घेण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे तरी सर्वांनी संघटित रित्या एकत्र जमावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत लिगाडे यांनी केले आहे
0 Comments