google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मौजे डिग्रज लिंगायत समाजातर्फे उपजिल्हाधिकारी यांचा सत्कार व विविध उपक्रमांचे आयोजन...

Breaking News

मौजे डिग्रज लिंगायत समाजातर्फे उपजिल्हाधिकारी यांचा सत्कार व विविध उपक्रमांचे आयोजन...

 मौजे डिग्रज लिंगायत समाजातर्फे उपजिल्हाधिकारी यांचा सत्कार व विविध उपक्रमांचे आयोजन...

सांगली प्रतिनिधी:-(संकेत पवार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) 

   मौजे डिग्रज ( सांगली ) येथे मा. श्री डी. एस. कुंभार यांची सांगली उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल

 मौजे डिग्रज मधील समस्त लिंगायत समाजाच्या वतीने प. पू. श्री. महेशआनंद स्वामी जी ( हंचनाळ ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी श्री. बसवेश्वर मंदिर परिसरातील प. पू. श्री महेशनंद स्वामी जी व कुंभार साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले, तसेच गेल्या 10 दिवसापासून मंदिरात बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते, 

या शिबिरात सहभागी मुला- मुलींचे स्वामी जी व कुंभार साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 याप्रसंगी मंदार व त्यांच्या धर्मपत्नी यांचा सत्कार प. पू महेशनंद स्वामी जी व डी. एस .कुंभार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर प. पू महेशआनंद स्वामी जी यांनी व डी. एस

कुंभार साहेबांनी समाजास प्रबोधन केले.यावेळी मौजे डिग्रज गावामधील लिंगायत समाजातील महिला व युवक वर्ग याठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होतो. 

तसेच यापुढे गावामध्ये समाजात राजकारण न करता समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाकडे व समाजातील प्रत्येक महिलेच्या हाताला काम द्यायचे हे आश्वासनं देखील दिले.

Post a Comment

0 Comments