पवारांपासून पटोलेंपर्यंत…स्व.आबासाहेबांच्या कार्याची, डॅा.बाबासाहेबांच्या उपस्थितीची छाप!!!
खरंच आबासाहेबांनी ५५वर्षात सांगोल्याच्या आमदारपदी विराजमान होऊन काय कमावलं…???
धन दौलत पद प्रतिष्ठा नव्हे तर शेतकरी वर्गापासून ते कामगारांपर्यंत आणि ना.श्री.पवारांपासून ते श्री.पटोलेंपर्यंत सर्वांचीच मने जिंकलीत !!!
आबासाहेबांनी काय कमावलं,
याचा हिशोब जनतेने ५५वर्षे दिलाच आहे,
पण सांगोल्याने काय गमावलं याचा हिशोब काल परवा झालेल्या कार्यक्रमांमधील सर्वच प्रमुख नेतेमंडळींनी जनतेला सुनावले…
आबासाहेबांच्या कार्यकाळात जी सांगोल्याची प्रगती झाली,शेतकरी कामगारांपासून ते सर्वसामान्य गोरगरिब जनतेपर्यंत आबासाहेबांची पोहोच होती,
विकासाची गंगा सर्वांच्या घरोघरी पोहोचविण्याची प्रामाणिक प्रांजळ भावना होती ती आजच्या लोकप्रतिनिधींकडून पहावयास मिळत नसल्याची खदखद बाहेर पडली ती नेतेमंडळींच्याच तोंडून…
नि:पक्ष,प्रामाणिक कार्य केल्यास,जनताच नव्हे तर सर्वपक्षीय नेते पक्षपात ,गटतट, भेदभाव विसरून समोरच नव्हे तर आपल्या पश्चात ही नाव काढतात,आठवण काढतात हे काल परवाच्या पवार साहेबांपासून ते पटेलेंजीच्या भाषणातून सर्वांनाच जाणविले…
स्व.आबासाहेबांनंतर आज डॅा.बाबासाहेबांकडे जशी जनता ज्या आशा-अपेक्षेने पाहत आहे तेच काल परवाच्या कार्यक्रमात नामदार श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वर्तनातून जाणविले.
भरगच्च दिग्गज नेतेमंडळींच्या गर्दीच्या स्टेजमधून ज्या प्रकारे डॅा.बाबासाहेबांचा हात पवार साहेबांनी जवळ बोलावून एक आशेने हात पकडला ,ती आशाच जनता आता पुर्ण करणार यात मात्र शंका नाही
0 Comments