मोठी बातमी..कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ 'या' नेत्याच्या गळ्यात, उद्या होणार शपथविधी !
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या चार ते पाच दिवसाच्या सस्पेन्सनंतर अखेर कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैया यांच्या गळ्यात पडली आहे.
तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. सिद्धारमैया हे काँग्रेसचे बुजुर्ग नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पूर्वीही कारभार पाहिला आहे. तसेच प्रशासनावर त्यांची प्रचंड पकड आहे.
ही त्यांची जमेची बाजू आहे. नवे मुख्यमंत्री उद्याच पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सिद्धरामैया यांच्या नावाची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात केली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धारमैया उद्या दुपारी 3.30 वाजता पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. त्यामुळे शपथविधी सोहळ्याची तयारी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या बंगळुरूमध्ये विधिमंडळ दलाची बैठक होईल. त्यावेळी पुढील रणनीतीवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सिद्धारमैया हे कर्नाटकातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. सिद्धारमैया यांनी आतापर्यंत 12 निवडणुका लढल्या आहेत. त्यापैकी 9 निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. सिद्धारमैया यांनी यापूर्वीही कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळलेली आहे. तसेच 1994मध्ये ते जनता दल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.
प्रशासनावर प्रचंड पकड असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचं एकही प्रकरण नाहीये. तर डीके शिवकुमार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे सुरू आहेत. भ्रष्टाचार प्रकरमी डीके शिवकुमार तुरुंगातही जाऊन आलेले आहेत.
0 Comments